मुंबई: गणेशोत्सव 2021 (Ganesh Chaturthi 2021) तोंडावर आला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी (konkan ganesh utsav) राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून (Toll Tax) सवलत देण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (PWD Minister Eknath Shinde) यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीनं उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.Also Read - BIG NEWS: बाप्पाला निरोप देताना वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या दृष्टीनं आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होती. Also Read - Ganesh Visarjan 2021: गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी, गणेशभक्तांना काळजी घेण्याचे आवाहन!

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहेत. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज,शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. Also Read - Andhericha Raja 2021: एका क्लिकवर पाहा अंधेरीच्या राजाचे मनमोहक रुप!

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याची घोषणा करतानाच या वाहनांसाठी स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई-पुणे, पुणे-सातारा, मुंबई-गोवा या महामार्गावरील पथकर नाक्यांवर अधिकचे मनुष्यबळ नेमणूक करुन गणेश भक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्यास वाहतूक कोंडी कमी होईल.

गणेश भक्तांशी वाद घालू नका…

पथकर नाक्यांवर गणेश भक्तांशी वाद घालू नका, पथकर सवलतीचे स्टीकर्स उपलब्ध करुन देण्याबरोबर पथकर नाक्यांवर रुग्णवाहिका, जलद प्रतिसाद वाहने, जेसीबीबरोबरच पुरेसे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करा. कोविडचे संकट पाहता भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

कोकणात जाणाऱ्या मार्गावर पोलिस तैनात

कोकणात जाणाऱ्या मार्गावर स्थानिक पोलिसांबरोबरच महामार्ग वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले असून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, वाहतूक खोळंबू नये यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.