मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असतानाच आता राज्याला आणि देशाला तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) धोका व्यक्त केला जात आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने संपूर्ण राज्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लगू आहेत. दरम्यान येत्या काही महिन्यात लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीर राज्य सरकारकडून गणेशोत्सवासाठी (Ganesh Utsav 2021) नियमावली जाहीर करण्यात आली आहे. (Maharashtra govt guidelines for Ganesh Utsav 2021)Also Read - Ganesh Chaturthi Special 2021: 'या' मुस्लिम राष्ट्राच्या चलनी नोटांवर विराजमान होते गणपती बाप्पा, वाचा रंजक किस्सा...

राज्यात अत्यंत उत्साहात गणेशोत्सव (Ganpati Festival 2021) साजरा केला जातो. या उत्सवात गावागावात आणि घरोघरी बाप्पांच्या मूर्तींची स्थापना केली जाते. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान नातेवाईकांचं घरी येणं जाणं होत असतं. तर सार्वजनिक गणेशोत्सव (Ganesh Utsav) मंडळात देखील तरूणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली (Ganesh Utsav guidelines) जाहीर केली आहे. गृह विभागाच्या सूचनेनुसार, सरकारने गणेश मूर्तीची उंची जाहीर केली आहे. (Maharashtra govt guidelines for Ganesh Utsav 2021) Also Read - Ashtavinayak Temples in Maharashtra: कोरोना काळात घरबसल्या घ्या अष्टविनायकाचं दर्शन

गणेशोत्सवासाठी काय आहेत नियम? (guidelines for Ganesh Utsav 2021)

  • घरगुती गणेशाची मूर्ती ही 2 फूट तर सार्वजनिक मंडळासाठी 4 फूटांच्या मूर्तीची परवानगी
  • गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी गरजेची. कोरोनाचा संसर्ग पाहून उत्सव साधेपणाने साजरा करावा.
  • गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
  • गणेशोत्सव मंडळांनी नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.
  • गणेशोत्सवादरम्यान मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
  • सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्यविषयक जनजागृती करणारे कार्यक्रम राबवावेत.
  • आरती, भजन किंवा किर्तन या कार्यक्रमांना होणारी गर्दी टाळावी.
  • नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.
  • गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात यावी.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन गृह विभागाकडून (Ministry of Home Affairs Department) या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षीही गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यंदा देखील गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांचं पालन करावं लागणार आहे.(Maharashtra govt guidelines for Ganesh Utsav 2021) Also Read - Ganpati Pratisthapana Pooja: घरच्या घरी करा गणपतीची प्रतिष्ठापना, मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा