मुंबई : 10 दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पाला (Ganpati Bappa) आज अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi 2021) दिवशी निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका (mumbai municipal corporations) सज्ज झाली आहे. कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव असल्याने मुंबईत गणपती विसर्जनासाठी (ganesh visarjan 2021) अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बाप्पाला निरोप देण्यासाठी काढण्यात येणारी विसर्जन मिरवणूक यावर्षी कोरोनाच्या परिस्थितीत होणार नाही. विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने (BMC) मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.Also Read - BIG NEWS: बाप्पाला निरोप देताना वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

मुंबई महानगरपालिकेने विसर्जनस्थळी योग्य ती व्यवस्था केली आहे. मुंबईमध्ये गणपती विसर्जनासाठी (Ganpati visarjan) 173 ठिकाणी कृत्रिम तलाव (Artificial lake) तयार करण्यात आले आहेत. गणेशभक्तांनी गणपती विसर्जनावेळी कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घ्यावी आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. Also Read - Anant Chaturdashi 2021: अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात का बांधला जातो 14 गाठींचा अनंत धागा? जाणून घ्या हे नियम

गणपती विसर्जनासाठी महापालिकेने लागू केल्या मार्गदर्शक सूचना – Also Read - Andhericha Raja 2021: एका क्लिकवर पाहा अंधेरीच्या राजाचे मनमोहक रुप!

– गणपती विसर्जनासाठी घरातूनच आरती करुन गणेशभक्तांनी निघावे.

– गणेश मूर्ती समुद्र किनारी महापालिका कर्मचाऱ्याकडे सुपूर्द करावी.

– सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समुद्रात गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करतील.

– बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.

– एका गणपतीसोबत फक्त ५ जणांना परवानगी.

– चाळीत जास्त गणपती असतील तर सर्व मूर्ती एकत्र विसर्जनासाठी काढाव्यात.

– मोठया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात पोलिस तैनात करण्यात येतील. फक्त कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करावे.

दरम्यान, राज्यासह संपूर्ण देशभरात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मात्र गणपती विसर्जनाची ती धूम पाहायला मिळणार नाही. कोरोनामुळे यावर्षीचा गणेशोत्सवही अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी नसल्याने अत्यंत साध्या पद्धतीने गणेशभक्त आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत.