
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
BMC Alert : मुंबईत सगळीकडे सध्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2022) आनंद पाहायला मिळत आहे. अवघ्या एका दिवसावर गणेशोत्सव सण (Ganesh Festival) येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळे जण आता गणपती बाप्पाच्या (Ganpati Bappa) आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बाप्पाच्या मूर्ती आणल्या आहेत तर अनेक गणेशभक्तांनी देखील बाप्पाच्या मूर्ती घरी आणल्या आहेत. बरेच जण आज आणि उद्या बाप्पाला घरी आणतील. अशामध्ये आता मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) गणेशभक्तांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीतील 13 धोकादायक पुलावर जास्तवेळ थांबू नका, असे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गणेशभक्तांना पालिकेकडून सूचना आणि आवाहन करण्यात आले आहे. मध्य रेल्वे मार्गावरुन (Central Railway Line) जाणारे 4 पूल आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन (Western Railway Line) जाणारे 9 पूल हे अतिशय जुने झाल्याने धोकादायक स्वरुपाचे झाले आहेत. त्यामुळे या पुलांपैकी काही पुलांच्या दुरुस्तीची कामं सुरु आहेत. तर काही पूलांच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहेत. त्यामुळे गणपती बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनासाठी पुलावरुन जात असताना ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये तसंच गाणी वाजवून नाचणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात. त्यासोबतच पुलावर जास्त वेळ न थांबता पुलावरुन त्वरीत पुढे जावे, असे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.
या धोकादायक पुलाबाबत मुंबई महानगर पालिकेकडून गणेशभक्तांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचसोबत, या पुलाबाबत मुंबई महानगर पालिका आणि मुंबई वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता यांच्याद्वारे करण्यात आले आहे. या धोकादायक पुलावर एकाच वेळी जास्त वजन होणार नाही याची काळजी घ्यावी असे देखील सांगण्यात आले आहे.
– घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज
– करी रोड रेल ओव्हर ब्रिज
– साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज
– भायखळा रेल ओव्हर ब्रिज
– मरिन लाईन्स रेल ओव्हर ब्रिज
– फॉकलंड रेल ओव्हर ब्रिज
– बोलासिस पूल
– महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज
– प्रभादेवी कॅरोल रेल ओव्हर ब्रिज
– दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज
– सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज
– फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज
– केनडी रेल ओव्हर ब्रिज
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या