By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Gas cylinder blast in Pune: पुण्याच्या कात्रजमध्ये एकामागोमाग एक 20 सिलेंडरचे भीषण स्फोट, पाहा फोटोज
Gas cylinder blast in Pune: पुण्याच्या कात्रज भागात एकामागोमाग एक 20 गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. कात्रजमधील गंधर्व लॉन्सजवळील गोडाऊनमध्ये सिलेंडरचे हे भीषण स्फोट झाले. या गोडाऊनाला अचानक आग लागल्याने एकामागोमाग एक तब्बल सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती आहे.

Gas cylinder blast in Pune: पुण्याच्या कात्रज (Katraj, Pune) भागात एकामागोमाग एक 20 गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. कात्रजमधील गंधर्व लॉन्सजवळील गोडाऊनमध्ये सिलेंडरचे हे भीषण स्फोट (Gas cylinder blast) झाले. या गोडाऊनाला अचानक आग लागल्याने एकामागोमाग एक तब्बल सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती आहे. यामुळे परिसरातील (Gas cylinder blast in Pune) नागरिकांमध्ये भिती परसली आहे.
माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. या घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
मात्र गोडाऊनला आग कशामुळे लागली याचे कराण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्फोटांमुळे आसपासच्या परिसराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या स्फोटांचा आवाज 2 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येत होता असे सांगितले जात आहे. यावरून हे स्फोट किती भीषण होते याचा अंदाज लावता येऊ शकतो. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती परसली आहे.
स्फोटाच्या ठिकाणचे काही फोटोज आणि व्हिडिओसुद्धा समोर आले आहेत. ते पाहून हे गॅस सिलेंडरचे स्फोट किती भीषण असतील याची कल्पना येते.