Gokul Milk Price Hike: उद्यापासून गोकुळचे दूध महागणार, म्हशीच्या दुधात 2 तर गायीच्या दुधात 1 रुपयांनी वाढ!

गोकूळ दुधाच्या दरात 11 जुलैपासून म्हणजे उद्यापासून दरवाढ होणार आहे.

Published: July 10, 2021 8:46 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Gokul Milk Price Hike
Gokul Milk Price Hike

कोल्हापूर : अमूल दुधापाठोपाठ (Amul Milk) आता गोकूळ दुधाच्या (Gokul Milk) दरामध्ये देखील वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळने दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ (sale and purchase price hike) करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत 25 वर्षांनी सत्तांतर झाल्यानंतर शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये दूधाच्या खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री सतेज पाटील (minister satej patil) यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आनंदित झाले आहेत. पण दूधाच्या दरामध्ये वाढ (Gokul Milk Price Hike) झाल्यामुळे सर्वसामान्य जनता नाराज झाली आहे.

Also Read:

गोकूळ दूध उत्पादक संघाने (Gokul Dudh Sangh) म्हशीच्या (Buffalo milk) खरेदी दरात 2 रुपयांनी तर गायीच्या दूध (Cows Milk) खरेदी दरात 1 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध खरेदी दरात वाढ करण्यात आल्यामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दूधाच्या खरेदी दरासोबतच विक्री दरातही वाढ होणार आहे. दुधाच्या विक्री दरात सुद्धा 2 रुपयांनी वाढ होणार आहे. गोकूळ दुधाच्या दरात 11 जुलैपासून म्हणजे उद्यापासून दरवाढ होणार आहे. त्यामुळे आता अमूल पाठोपाठ गोकूळ दुधाची खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

गोकूळ दूधाच्या दरात वाढ झाल्यामुळे आता मुंबई आणि पुण्यातील नागरिकांना (Mumbai pune people) दूध खरेदी करताना जास्त पैसे द्यावे लागणार आहे. आधीच महागाईमुळे (inflation ) त्रस्त झालेल्या जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. आधीच खाद्य तेल आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे (Petrol-Disel Price hike) सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यात आता दुधांच्या दरातही वाढ होत असल्यामुळे सर्व सामान्याचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: July 10, 2021 8:46 AM IST