live

Maharashtra Gram panchayat Election Result 2022: ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर! पाहा राज्यात कुठे कोणाचं वर्चस्व?

Maharashtra Gram panchayat Election Result 2022 : मुंबई आणि उपनगर वगळता राज्यात 34 जिल्ह्यातील 7682 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. तुम्ही येथे खाली सर्व निकाल पाहू शकता.

Updated: December 20, 2022 8:58 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल

Maharashtra Gram panchayat Election Result 2022  : राज्यात गेल्या रविवारी पार पडलेल्या 7135 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणूकीत राजकीय पक्षांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली. काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली तर काही ठिकाणी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामुळे कोण बाजी मारणार, कुणाचा झेंडा फडकणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर आज निकाल जाहीर झाले आहेत. मुंबई आणि उपनगर वगळता राज्यात 34 जिल्ह्यातील 7682 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. तुम्ही येथे खाली सर्व निकाल पाहू शकता.

आतापर्यंतच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप-शिंदे गटाने वर्चस्व राखल्याचे चित्र आहे. 7751 पैकी भाजप आणि शिंदे गटाकडे 2770 ग्रामपंचायती आल्या आहेत. महाविकास आघाडीने 2590 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

पाहा निकालाचे अपडेट्स….

Live Updates

  • Sep 27, 2023 3:12 PM IST
    मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांचे वर्चस्व
    13 पैकी 12 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा
  • Dec 20, 2022 8:37 PM IST
    जालना जिल्ह्यातील जवखेडा गावचा निकाल हाती
    रावसाहेब दानवेंची भावजय सुमन दानवे विजयी
    रावसाहेब दानवेंच्या गावात 30 वर्षांनंतर झाली निवडणूक
  • Dec 20, 2022 8:36 PM IST
    मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांचे वर्चस्व
    13 पैकी 12 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा
    “भाजप-शिंदे गटाला या निवडणुकीत जनतेने नाकारले”
    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
  • Dec 20, 2022 8:33 PM IST
    पुणे जिल्ह्यात अजित पवारांचे वर्चस्व, चंद्रकांत पाटलांना धक्का
    पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे वर्चस्व
    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना धक्का
    अजित दादांनी 221 पैकी 92 ग्रामपंचायती ताब्यात घेऊन राखला गड
    भाजपला अवघ्या 38 ठिकाणी विजय मिळवण्यात यश
  • Dec 20, 2022 8:31 PM IST
    करमाळा तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची सत्ता
    माजी आमदार नारायण पाटील गटाची एकहाती सत्ता
    राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार संजयमामा शिंदे यांचा 10 ग्रामपंचायतीवर विजय
  • Dec 20, 2022 8:30 PM IST
    विदर्भ, कोकण सगळीकडे आमची सरसी झाली
    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निकालानंतर प्रतिक्रिया
    आमच्या युतीला दणदणीत विजय मिळाला
    राज्यात 3 हजार 29 ग्रामपंचायती आमच्या आल्यात आहेत.
    विदर्भ, कोकण सगळीकडे आमची सरसी झाली आहे
    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
  • Dec 20, 2022 8:28 PM IST
    मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व
    ठाण्याीत 42 पैकी 20 ग्रापंपचायतीवर भाजपचा झेंडा
    शिंदे गटाचे 13 पॅनल, तर ठाकरे गटाचे पाच पॅनल निवडून आले.
  • Dec 20, 2022 5:31 PM IST
    औरंगाबाद जिल्ह्यात कोणाला किती जागा?
    216 पैकी 35 निकाल आलेत
    ठाकरे गट 4
    शिंदे गट 12
    भाजप 9
    काँग्रेस 01
    राष्ट्रवादी 3
    इतर 6
  • Dec 20, 2022 5:27 PM IST
    इंदुरीकर महाराजांच्या सासू सरपंच
    संगमनेरमध्ये किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासू सरपंच
    निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवला विजय
    अपक्ष उमेदवारी दाखल करून लढली निवडणूक
    शशिकला शिवाजी पवार यांचा सरपंच पदावर विजय
    विखे आणि थोरात गटाला शह देत बनल्या सरपंच
  • Dec 20, 2022 5:26 PM IST
    जळगाव जिल्ह्यात एकूण 122 ग्रामपंचायत निवडणूक निकाल
    भाजप :- 23
    शिंदे गट :- 6
    राष्ट्रवादी :- 19
    काँग्रेस :- 2
    इतर :- 5

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.