
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
GST Rate Hike : महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त झाली आहे. अशामध्ये आजपासून आणखी महागाई वाढणार आहे. आजपासून अनेक गरजेच्या वस्तू महाग होणार आहेत त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे. कारण आजपासून केंद्र सरकारने (Central Government) वाढवलेल्या जीएसटीची (GST) भर पडणार आहेत. जीएसटीची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे अन्नपदार्थांपासून, रुग्णालयातील उपचार, प्रवास, जीवानावश्यक वस्तू महाग होणार आहेत.
जीएसटी काउंसिलची 47 वी बैठक (GST Council Meeting) 28-29 जून रोजी पार पडली. जीएसटी कौन्सिलने सामान्य माणसांद्वारे वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला. तसेच अनेक वस्तूंसाठी उपलब्ध जीएसटी सूट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही वस्तू अशा आहे ज्यावर जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय आजपासून लागू होणार आहे.
आजपासून रुग्णालयात उपचार घेणे महाग होणार आहे. रुग्णालयाने 5 हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खोली उपलब्ध करुन दिल्यास त्या खोलीवर 5 टक्के दराने जीएसटी द्यावा लागणार आहे.
टेट्रा पॅक असलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखाना, कोरडे सोयाबीन, मटार, गहू, पीठ, इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता 5% जीएसटी लागू होईल. आत्तापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती.
आजपासून मुलांचे शिक्षण महागणार आहे. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित साहित्य महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवा, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने चाकू, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल.
यापुढे हॉटेलमध्ये राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. आधी 1 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या हॉटेलच्या खोल्यांवर जीएसटी नव्हता. पण आत 12 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.
एलईडी लाइट्स, एलईडी लॅम्प, ब्लेड, पेपर कात्री, पेंसिल शार्पनर, चमचा, काटा चमचा, स्किमर्स आणि केक-सर्व्हर्स आदीवर 18 टक्के दराने जीएसटी द्यावा लागेल. सध्या यावर 12 टक्के जीएसटी आकारला जात आहे.
गोदामामध्ये ड्रायफ्रूट्स, मसाले, गूळ, कापूस, चहा, कॉफी या गोष्टी ठेवणे महाग होणार आहे. यासाठी यापुढे 12 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.