Top Recommended Stories

Gudipadwa Gift: ठाकरे सरकारकडून कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याचे गिफ्ट, महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी केली वाढ

Gudipadwa Gift: ठाकरे सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याचे गिफ्ट म्हणून महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. महत्वाचे म्हणजे ही वाढ मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना आनंद झाला आहे.

Updated: March 31, 2022 9:55 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Thackeray government
Thackeray government

Gudipadawa Gift : केंद्र सरकारपाठोपाठ (Central Government) आता राज्य सरकारच्या (Maharashtra Government) कर्मचाऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. केंद्रानंतर आता राज्य सरकारने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता (Dearness allowance) देण्याची घोषणा केली आहे. ठाकरे सरकारने (Thackeray Government) आपल्या कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याचे गिफ्ट (Gudipadwa Gift) म्हणून महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. महत्वाचे म्हणजे ही वाढ मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना आनंद झाला आहे.

जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या तीन महिन्यांच्या कालावधीत 11 टक्के महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम मार्च 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र शासनाना परिपत्रकाद्वारे दिली आहे. तर राज्य शासकीय कर्मचारी इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाई भत्ता वाढ ही 1 जुलै 2021 पासूनच्या थकवाकीसह मार्च 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे, अशी माहिती परिपत्रकामध्ये देण्यात आली आहे.

You may like to read

दरम्यान, 1 जुलै 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28 टक्क्यांवरुन 31 टक्क्यांवर गेला आहे. राज्य सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांना खूप आनंद झाला आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या देखील महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. मार्च महिन्यातील शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्यात (Dearness allowance) 3 टक्के वाढ करून 34 टक्के डीएला मंजुरी (DA Arrear) देण्यात आली. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Cabinet meeting) पगारासोबतच वाढीव डीएचा लाभ (Benefit of increased DA) दिला जाणार आहे. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 ची थकबाकी देखील मिळणार आहे. नवीन महागाई भत्ता 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.