Top Recommended Stories

Gunaratna Sadavarte च्या अडचणी वाढल्या; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ऑर्थर रोड जेलमध्ये रवानगी

Gunaratna Sadavarte Problem Increase : गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुणरत्न सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या (Kolhapur Police) ताब्यात आहेत. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिस मुंबईतील ऑर्थर जेलकडे (Arthar Road Jail) घेऊन रवाना झाले आहेत.

Published: April 25, 2022 4:01 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte

Gunaratna Sadavarte Problem Increase : एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) वकील गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांच्या अडचणी आणखी वाढत चालल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्या अडचणी वाढत आहेत.  गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुणरत्न सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या (Kolhapur Police) ताब्यात आहेत. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिस मुंबईतील ऑर्थर जेलकडे (Arthar Road Jail) घेऊन रवाना झाले आहेत.

Also Read:

गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई, पुणे, सातारा त्यानंतर कोल्हापूरात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा पोलिसांनंतर सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. कोल्हापुरात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर सदावर्ते यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 14 दिवासंची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

You may like to read

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सदावर्ते यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान, सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर न्यायालयात दाखल झाले होते. त्यांचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज देखील केला आहे. पण कोल्हापूर पोलिस सदावर्तेंना घेऊन मुंबईच्या ऑर्थर रोड जेलकडे रवाना झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्य केल्यामुळे सदावर्तेंवर कारवाई केली जात आहे. आधी पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर एकापाठोपाठ राज्यातील अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हापासून त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई सुरुच आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 25, 2022 4:01 PM IST