New Guidelines: जीम, सलून आणि ब्युटी पार्लर सुरु करण्यास अटींसह परवानगी, ठाकरे सरकारने नियमावलीत केले बदल!
ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमेतेने सुरु ठेवता येणार आहे.

New Guidelines By Maharashtra Government: राज्यात पुन्हा कोरोनाने (Corona Virus) डोकं वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा (Covid- 19) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. अशामध्ये आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona New Variant) ओमिक्रॉनमुळे सुद्धा लोकांची भीती वाढवली आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनाचा आणि ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता ठाकरे सरकारने (Thackeray Government) राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. सोमवारपासून राज्यात हे नवीन निर्बंध लागू होतील. यासंदर्भातील नियमावली सरकारने (Maharashtra Government) शनिवारी जाहीर केली. पण आता या निर्बंधांमधील सलून (Saloon), ब्युटी पार्लर (Beauty Parlor) आणि जीम (Guym) यासंदर्भांतील निर्बंधात सरकारने काही बदल केले आहेत. याबाबत नवे आदेश रविवारी जारी करण्यात आले आहेत.
Also Read:
- China Corona : चीनने वाढवलं टेंशन, कोरोना रुग्णांचा पुन्हा उद्रेक! हॉस्पिलमध्ये जागाच नाहीत
- Sharad Pawar Birthday : 82 वर्षांचे झाले शरद पवार, देशाच्या सर्वात प्रभावशाली नेत्याचा असा आहे राजकीय प्रवास!
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच! ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात, NCPची खोचक टीका
ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमेतेने सुरु ठेवता येणार आहे. त्याचप्रमाणे जीम सुद्धा 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार आहे. हे सुधारित नियमावलीमध्ये ठाकरे सरकारने सांगितले आहे. यापूर्वी म्हणजे शनिवारी जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये जीम, सलून आणि ब्युटी पार्लर दोन्ही बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यामुळे जीम आणि ब्युटी पार्लर मालकांना दिलासा मिळाला आहे.
नव्या नियमावलीनुसार, ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येणार आहेत. सलूनमध्ये मास्क काढता येणार नाही अशाच सेवा सुरु राहतील. मास्क लावून जी कामं करता येतील अशाच कामांना परवानगी देण्यात आली आहे. फक्त पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वारण्याची परवानगी असेल. ब्युटी पार्लर, सलूनमधील कर्मचाऱ्यांचे देखील पूर्ण लसीकरण झालेले असावे.
जीमसंदर्भात ठाकरे सरकारने जे नवीन निर्बंध लागू केले आहेत त्यानुसार मास्क वापरण्याच्या अटीवरच 50 टक्के क्षमतेसह जीम सुरु ठेवता येणार आहे. फक्त पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच जीममध्ये येण्याची परवानगी देण्यात यावी. त्याचप्रमाणे जिममध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. या अटींवरच जीम सुरु करता येणार आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या