मुंबई: राज्यातील जनतेची चिंता वाढवणारी बातमी आहे. डेल्टा प्लस विषाणूची (Delta Plus Variant In Maharashtra) लागण झालेले 21 रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक नऊ रुग्ण रत्नागिरीत (Ratnagiri) तर जळगाव (Jalgaon) येथे सात रुग्ण आहेत. मुंबई (Mumbai) दोन आणि पालघर (Palghar), सिंधुदुर्ग (Sindhudurg), ठाणे (Thane) येथील प्रत्येकी एक रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.Also Read - Building collapsed at Kalyan: मुंबईतील कुर्ल्यानंतर कल्याणमध्ये कोसळली इमारत; एकाचा मृत्यू, दोघे सुखरुप

आरोग्यमंत्री म्हणाले, डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 21 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 15 मे पासून 7500 नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 केसेस आढळून आले आहेत. आता डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे, त्याबाबत सविस्तर माहिती घेण्याचं काम सुरू आहे. Also Read - Rakhi Sawant On Alia Bhatt Pregnancy : आलियाच्या प्रेग्नेंसीवर राखी सावंतनेही व्यक्त केली आई होण्याची इच्छा, म्हणाली 'लग्ना आधीच...'

राज्यानं जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला होता. त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्यात आले. या महत्त्वाच्या कामात सीएसआयआर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आल्याची माहित आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिली. Also Read - Upasana Singh Birthday : दूरदर्शनवर वयाच्या 7 व्या वर्षीच सुरु केला होता अभिनय, असा आहे उपासना सिंह यांचा प्रवास

या इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेण्यात येत आहे. रुग्णांनी केलेला प्रवास, लस घेतली आहे की नाही. त्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती काय, त्यांच्या संपर्कात कोण कोण आलं, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या कुटुंबातील सहकाऱ्यांची देखील तपासणी करण्यात येत आहे. तसेच सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण देखील केलं जात आहे.