मुंबई : राज्यावर कोरोनाचे (Corona Virus) संकट आहे. कोरोनाचा फटका गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2021) देखील बसला आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सरकारने (Maharashtra Government) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली होती. त्याचे पालन करतच हा सण साजरा केला जात आहे. अशामध्ये गणेशोत्सवानंतर (Ganpati festival) राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, असे मत महाराष्ट्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी (Health Officer) व्यक्त केले आहे. केरळमध्ये ओणम सणानंतर कोरोना रुग्णांमध्ये (Corona Patient) वाढ झाली याचा दाखला देत त्यांनी राज्यातील 10 दिवसांच्या गणेशोत्सवावरून सावध केले आहे.Also Read - Breaking News Live Updates: राज्यात सध्यातरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, ‘सणादरम्यान गर्दी वाढते आणि नागरिक कोरोनाचे मूलभूत नियम पाळणे विसरतात. मास्क घालणे (Mask) आणि सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) पालन करण्यास विसरतात. त्यामुळे समस्या वाढते. अशामध्ये राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना सल्ला जारी केला आहे आणि पाच जिल्ह्यांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. चाचण्यांची सुविधा तसेच रुग्णांचे विलगीकरण (Separation) आणि औषध व्यवस्था इत्यादींबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. Also Read - Corona Vaccine: पालकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपासून 12 ते 17 वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस!

आरोग्य अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, ‘एकीकडे राज्य सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा न करण्याविषयी सांगत आहे, तर दुसरीकडे कोकणात (Kokan) लोकांना नेण्यासाठी हजारो बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण कोरोनावर नियंत्रण कसे ठेवू शकतो? असा सवाल त्यांनी केला आहे. 9 फेब्रुवारीनंतर शनिवारी पहिल्यांदा महाराष्ट्रात सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. मुंबईत (Mumbai) 361 नवीन रुग्ण आढळले, ज्यामुळे संक्रमित लोकांची एकूण संख्या 16,015 झाली. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत 64,94,254 लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. दरम्यान, सणासुदीच्या (Festive) काळात नागरिकांनी काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर नियमांचे पालन केले पाहिजे. Also Read - Breaking News Live Updates: चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री; काँग्रेस हायकमांडकडून नावावर शिक्कामोर्तब