By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Heat Wave in Maharashtra: सावधान! राज्यात 1 एप्रिलपर्यंत राहणार उष्णतेची लाट; 'या' जिल्ह्यात अलर्ट
राज्यात (Maharashtra ) उन्हाची तिव्रता सुरुवातीपासूनच जाणवत आहे. यंदा तापमान (Temperature) जास्त राहणार असे वाटत असताना भारतीय हवामान विभागाच्या (MID) प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे.

Heat Wave In Maharashtra : राज्यात (Maharashtra ) उन्हाची तिव्रता सुरुवातीपासूनच जाणवत आहे. यंदा तापमान (Temperature) जास्त राहणार असे वाटत असताना भारतीय हवामान विभागाच्या (MID) प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 एप्रिलपर्यंत म्हणजेच आजपासून पुढील चार दिवस राज्यात उष्णतेची (Heat Wave) लाट राहणार आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि गुजरात राज्याकडून उष्णतेची लाट येणार आहे.
राज्यातील जळगाव (Jalgaon), औरंगाबाद (Aurangabad), अहमदनगर (Ahmednagar), जालना (Jalna), परभणी (Parbhani) आदी जिल्ह्यात ही लाट अधिक प्रमाणात जाणवणार आहे.
जळगावात तीन दिवस राहणार उष्णतेची तीव्र लाट
भारतीय हवामान विभागाच्या (MID) प्रादेशिक हवामान केंद्र, मुबईने वर्तविलेल्या शक्यतेनुसार जळगाव जिल्ह्यात आज 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान, उष्णतेची तीव्र लाट राहणार आहे. यासाठी जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने बचाव व उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे. त्यानुसार संबंधित सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका व आरोग्य विभाग सतर्क आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी देखील या दरम्यान, उपाययोजना राबवावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केली आहे.
Trending Now
जळगाव नेहमी हॉट
राज्यात दरवर्षी तापमानाच्या बाबतीत जळगाव जिल्हा चर्चेत राहतो. उन्हाळ्यात येथील तापमान 46 अंशापर्यत पोहचते. राज्यात नागपूरनंतर जळगावचे तापमान सर्वाधिक असते. या वाढत्या तापमानामुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यात मे हिट पूर्वीचा म्हणजेच 29 मार्च ते 1 एप्रिल 2022 दरम्यान, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने चिंता वाढली आहे. जळगावकरांना यंदा मे हिटचा जबरदस्त फटका सहन करावा लागणार हे नक्की !
या जिल्ह्यात राहणार उष्णतेची लाट
-29 मार्च 2022 – जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती.
-30 मार्च 2022 – जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, अमरावती.
-31 मार्च 2022 – जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर.
-1 एप्रिल 2022 – जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी आणि हिंगोली.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या