मुंबई : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मान्सूनने (Monsoon) महाराष्ट्राचा निरोप घेतला. याबाबत हवामान खात्याने (weather department) माहिती दिली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातून मान्सून परतला असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केले आहे. पण अशामध्ये आजपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर (Heavy Raifall) वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कारण बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून आज मराठवाड्यातील (Marathwda) काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.Also Read - MPSC Exam 2022: MPSC परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या परीक्षेच्या तारखा!

आज नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर या दहा जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता असून याठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Heavy rain with thunderstorms) पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये किंवा मोठ्या झाडांच्या खाली उभे राहू नये, असा सल्ला भारतीय हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर (Indian meteorologist Krishnananda Hosalikar) यांनी दिला आहे. तर रविवारी कोकण (Kokan), घाट परिसर आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या भागांमध्ये वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. Also Read - Rainfall Update: हिवाळी पावसाची बॅटिंग आजही सुरुच राहणार, राज्याच्या या भागात कोसळणार सरी!

दरम्यान, राज्यात यावर्षी 4 महिने 9 दिवस पाऊस पडला आहे. दोन दिवस आधी महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने (Monsoon) यावर्षी एक दिवस आधीच महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. दरम्यान गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पाऊस गेल्यामुळे सगळीकडे गरम होण्यास सुरुवात झाली आहे. कडक उन्हामुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. Also Read - Omicron Update: टेन्शन वाढले! दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत आले 87 जण, दोघे जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह