मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील महिला मानसोपचार तज्ज्ञानं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची मुंबई हायकोर्टानं (Mumbai Highcourt) दखल घेतली आहे. या प्रकरणी कोर्टानं मुंबई पोलिस आयुक्तांना (Mumbai Police Commissioner) लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर तक्रारीचं निवारण करून तपास अहवाल 24 जूनला कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.Also Read - Maharashtra Political Crisis: 'महाराष्ट्रात बंड करायची हिंमत नाही म्हणून बाहेर पळाले, तुमची लायकी असती तर....': आदित्य ठाकरे

काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यानुसार आपल्यावर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप तक्रारदार महिला मानसोपचार तज्ज्ञनं केले आहेत. महिलेनं दाखल केलेल्या याचिकेची हायकोर्टानं दखल घेतली आहे. या प्रकरणात लक्ष घालून तक्रारीचं निवारण करण्याचे आदेश हायकोर्टानं मुंबई पोलिसांना दिले आहे. त्याचबरोबर 24 जूनरोजी तपासचा सद्य स्थितीचा अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. Also Read - Maharashtra Political Crisis : "शिवसेनेला पूर्णपणे कमकुवत करण्याचा डाव", भाजप नेत्याचा मोठा दावा

संजय राऊतांवर काय आहेत आरोप?

संजय राऊत हे आपला गेल्या सात वर्षांपासून छळ करत होते. माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांनी माणसं लावली होती. हेरगिरी करणं, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणं, शिवीगाळ करणं, धमक्या देणं असं अनेक गंभीर आरोप मानसोपचार तज्ज्ञ महिलेनं केले आहेत. याप्रकरणी संबंधित महिलेनं मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये मुंबई पोलिसांना देखील प्रतिवादी करण्यात आलं आहे. त्याचआधारे हायकोर्टानं आता थेट मुंबई पोलिस आयुक्तांना याप्रकरणात तक्रारीचं निवारण करण्याचे आदेश दिले आहेत. Also Read - Maharashtra Political Crisis: बंडखोरांविरोधात शिवसैनिक आक्रमक, राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता!

निलेश राणेंकडून संजय राऊतांचा ‘समाचार’

मुंबई हायकोर्टानं महिलेच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर भाजपचे नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane)यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी एक ट्वीट करुन राऊतचा समाचार घेतला आहे. #arrestsanjayraut असा हॅशटॅगचा वापर करून संजय राऊत यांना अटक करा अशी मागणी, निलेश राणे यांनी केली आहे. संजय राऊतांची महिलेच्या आयुष्याची वाट लावली आहे, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. तक्रारदार महिला गेल्या अनेक वर्षांपासून संजय राऊतांचा जाच सहन करत होती. दोन आठवड्यांपूर्वी या महिलेला पोलिसांनी अटक देखील केली होती. त्यामुळे कोर्टानं संजय राऊतांच्या प्रकरणात दिलेले आदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, अशी मी विनंती करतो. कारण, प्रसारमाध्यमं संबंधीत वृत्त दाखवत नसल्याचं देखील राणे यांनी म्हटलं आहे.