By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Hsc Exam hall Ticket: 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शिक्षण मंडळाने केली 'ही' घोषणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी घेण्यात येणाऱ्या 12 वी (12 th Board Exam) परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Hsc Exam hall Ticket: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी घेण्यात येणाऱ्या 12 वी (12 th Board Exam) परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना उद्यापासून ऑनलाईन पद्धतीने (Online Hall ticket) हॉलतिकीट मिळणार आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. विद्यार्थी उद्या दुपारी एक वाजेनंतर मंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.mahahssboard.in वरून हॉलटिकीट (Hsc Exam hall ticket) डाऊनलोड करू शकतात. तसेच शाळा आणि महाविद्यालयातून ऑनलाईन हॉलतिकीटची प्रिंट मिळणार आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा ऑफलाईन (Offline Exam) परीक्षा घेणाचा निर्णय शिक्षण मंडळाने आधीच जाहीर केला होता. त्यानुसार मंडळाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर (SSC And HSC Exam Time Table 2022) केले आहे. अवघ्या महिन्याभरावर या परीक्षा येऊन ठेपल्या आहे.
राज्यात बारावी परीक्षांसाठी 14,72, 564 विद्यार्थी बसले आहेत. यंदा ‘झिग झॅक’ पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जेथे शाळा तेथेच परीक्षा होणार आहे. यामुळे मुलांच्या मनातील भीती कमी होईल. त्यांना चांगले वातावरण मिळेल, असं शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
Trending Now
4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा होईल. तर 14 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 दरम्यान इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा होणार आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे दोन वर्षांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन क्लास घेण्यात येत आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली. विद्यार्थ्यांचा लिखाणा वेग कमी झाल्यामुळे परीक्षेचा कालावधी अर्धा तासाने वाढवण्यात आला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या