नालासोपारा : विरारमध्ये (Virar) बँकेवर दरोडा (Bank Robbery) पडल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास विरारमधील आयसीआयसीआय बँकेवर (ICICI Bank) सशस्त्र दरोडा घालण्यात आला. यावेळी आरोपींनी बँक मॅनेजर आणि कॅशियरवर हल्ला (Attack on bank manager and cashier) केला. या हल्ल्यात बँक मॅनेजरचा मृत्यू (Bank manager killed) झाला तर कॅशियर गंभीर जखमी (Cashier injured) झाली. बँकेतील पैसे आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढणाऱ्या एका आरोपीला नागरिकांनी पकडून ठेवले आणि पोलिसांच्या (Virar Police) ताब्यात दिले. तर दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.Also Read - Kalyan Rape Case: संतापजनक! कल्याणमध्ये शिक्षकाने 8 वर्षांच्या चिमुकलीवर केला बलात्कार, आरोपीला अटक

विरार पूर्वेच्या मनवेल पाडा (Virar Manvel Pada) येथे असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या शाखेमध्ये गुरुवारी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी बँक बंद झाल्यानंतर सर्व कर्माचारी निघून गेले होते. बँकेमध्ये फक्त मॅनेजर योगिता वर्तक आणि कॅशियर श्वेता देवरुखकर होत्या. आरोपींनी बँकेत कमी कर्मचारी असल्याचा फायदा घेत बँकेत घुसून दरोडा टाकला. त्यांनी बँक मॅनेजर आणि कॅशियरच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि बँकेतील पैसे आणि दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. पण दोघींनी विरोध केल्यामुळे दरोडेखोरांनी आधी चाकूने वार करत बॅक मॅनेजरची हत्या केली. तर कॅशियरवर देखील जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात कॅशियर श्वेता देवरुखकर गंभीर जखमी झाली. तिच्यावर नजीकच्या रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. Also Read - Dombivli Gangrape: धक्कादायक! गँगरेपने डोंबिवली शहर हादरले, 14 वर्षांच्या मुलीवर 29 जणांनी केला बलात्कार

दागिने आणि पैसे घेऊन आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण नागरिकांनी दागिने आणि पैशांच्या बॅगेसह एकाला पकडून ठेवले. तर दुसरा आरोपी पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी पकडलेल्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरोडा टाकणारा आरोपी पूर्वी याच शाखेत मॅनेजर होता. त्याच्यावर एक कोटी रुपयांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठीच त्याने हा डाव रचला असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. Also Read - Terror Module: महाराष्ट्र ATSने मुंब्र्यातून संशयित दहशतवादी 'मुन्नाभाई'ला केली अटक