Maharashtra Rainfall: राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना बसणार फटका
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी (Cold wave) चांगलीच वाढली आहे. थंडीने अक्षरश: सर्वजण गारठले आहेत. अशामध्ये आता राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने (IMD Alert) दिला आहे. 10 जानेवारीपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह आणि विजयांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. त्याचसोबत विदर्भामध्ये 9 जानेवारी रोजी गारपिटीची (hailstorm) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.
Also Read:
राज्यातील किमान तापमानात किंचितशी वाढ झाली असून पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने (weather department) वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढचे चार दिवस राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. हवामान खात्यातून अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. राज्यामध्ये सर्वात कमी किमान तापमान हे गोंदिया जिल्ह्यात असून याठिकाणी 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईमध्ये किमान तापमान 21 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
7 जानेवारीपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 7 जानेवारी म्हणजे आज नाशिक, नंदूरबार, धुळे, पालघर, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात पावासाची शक्यता आहे. 8 जानेवारी रोजी जळगाव, नंदूरबार, जालना, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमान, वर्धा, नागपूर, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, बीड, लातूर परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
9 जानेवारी म्हणजे रविवारी बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोल, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, जळगाव, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नगापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 9 जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर 10 जानेवारी रोजी अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, जालना, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या