सोलापूर: (संदीप शिंदे): निसर्गाच्या लहरीपणा आणि आस्मानी संकटाचा सामना करताना आता देशातील शेतकरी (Farmer) पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेतीकडे वळला आहे. अशातच घरगुती टाकाऊ वस्तुंपासून एका शेतकऱ्यानं जुगाड (Indian Jugad) केला आहे. तो म्हणजे शेतकऱ्यानं फवारणी पंत तयार केला आहे. मानेगाव येथील रहिवासी विश्वजीत पाटील (Vishvjeet Patil, Manegaon) असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. विश्वजीत पाटील यांनी टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ फवारणी पंप आता परिसरात आकर्षण ठरला आहे.Also Read - Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं...

फळ बाग असो अथवा कांदा, टोमॅटो, मिरची, काकडी, कारले यासह इतर पिकांना कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी पंपाची गरज भासते. बाजारात अनेक कंपन्यांचे 3 ते 5 हजारांपर्यंत फवारणी पंप आहेत. मात्र शेतकरी पाटील यांनी पिकांच्या औषध फवारणीसाठी बनवलेला हा पंप घरातील आडबाजूला पडलेल्या टाकाऊ वस्तूपासून बनवला आहे. केवळ 1 हजार ते 1200 रुपयांपर्यंतच्या खर्चात हा पंप तयार झाल्याचं विश्वजीत पाटील सांगतात. या पंपामुळे पैशा बरोबरच वेळेची, औषधाची बचत होणार आहे. Also Read - Mumbai Local Mega Block: आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा!

गरजू शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध होणाऱ्या पंपाला शेतकऱ्यांमधून विशेष मागण्या होत आहे. विश्वजीत पाटील यांनी पंपाला विजेची देखील व्यवस्था देखील केली आहे. त्यामुळे रात्री देखील फवारणी करता येते. पंप एकदा चार्ज केल्यावर 12 तास पंप सुरु राहतो. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त फवारणी करता येते. रोग नियंत्रण व तननाशकासाठी या पंपाचा फायदा होतोय. Also Read - Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!

200 मिलीमध्ये राऊंड अप टाकल्यास एक एकर द्राक्षाची फवारणी करता येते. घरच्या घरी देखील हा पंप शेतकऱ्यांना बनवता येतो. त्यामुळे हा पंप निश्चितच शेतकर्याना उपयुक्त ठरणारा असाच आहे.

राज्यभरात आयोजित केलेल्या 5 कृषी प्रदर्शनात विश्वजित पाटील यांनी पंपाची मांडणी करुन सादरीकरण देखील केले होते. अनेक नेते मंडळीसह कृषी अधिकाऱ्यांनी प्रदर्शनात येऊन पाहणी देखील केली होती. मात्र या शेतकऱ्यांच्या प्रयोगाला पाठबळ तर दूरच साधी कौतुकाची थापही दिली नाही. याबाबत पाटील यांनी खंत देखील बोलून दाखवली.

या साहित्यातून तयार झाला पंप…

– 5 लिटरचा प्लॅस्टिक ड्रम
-खेळण्यातील इलेक्ट्रीक मोटर
-खराब मोबाईलचा चार्जर
-एक इंची पाईप (3 फूट)
-एलइडी लाईट पॅनल

इतर पंपाच्या तुलनेत वजनाने अतिशय हलका आहे. दुरुस्ती देखील करण्याची गरज भासत नाही. विशेष म्हणजे पैसे, वेळ आणि औषधाची बचत देखील या पंपाने होते. एकदा चार्ज केल्यावर 12 तास पंप चालत असून लाईटची देखील व्यवस्था पंपाला केल्याने रात्री देखील फवारणी करता येते. कृषी विभागाच्या पाठबळाची गरज मिळाल्यास निश्चितच मला आधार मिळेल. प्रत्येक शेतकऱ्याना फायदेशीर ठरणारा हा पंप आहे, अशी माहिती विश्वजित पाटील यांनी दिली.