By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Job Alert: रोजगाराच्या शोधात असलेल्यांसाठी खुशखबर! नाशिकच्या 'या' कंपनीत 500 पेक्षा जास्त जागांसाठी भरती
Job Alert: या कंपनीतर्फे विविध पदांसाठी 500 पेक्षा जास्त जागा भरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड होणार आहे. त्यानुसार जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल माहिती...

Job Alert: नोकरीच्या शोधात असलेल्या (job seekers) तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. नाशिक (Nashik) येथील एका खासगी कंपनीने भरतीबाबत (Recruitment ) नोटिफिकेश जारी केले आहे. कंपनीतर्फे विविध पदांसाठी 500 पेक्षा जास्त जागा भरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड होणार आहे. त्यानुसार जाणून घेऊया भरती प्रक्रियेबद्दल माहिती…
WNS प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, नाशिक (WNS Global Service Nashik) या कंपनीत भरती निघाली आहे. 500 पेक्षा जास्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यात सहयोगी, वरिष्ठ सहयोगी, गट व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक गट व्यवस्थापक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता –
सहयोगी /वरिष्ठ सहयोगी (Associate/Senior Associate) –
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असावा. उमेदवाराने मान्यता प्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून हे शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवारांना लॉजिस्टिक, हेल्थकेअरमध्ये संबंधित पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
गट व्यवस्थापक(Group Manager) –
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे CA पर्यंतचे शिक्षण झालेले असावे. मान्यता प्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून हे शिक्षण पूर्ण केलेले असावे. यासह संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.
सहाय्यक व्यवस्थापक/गट व्यवस्थापक (Assistant Manager/ Group Manager) –
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे कोणत्याही विषयातील पदवीपर्यंत शिक्षण झालेले असावे. मान्यता प्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून हे शिक्षण पूर्ण केलेले असावे. यासह संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे. वरील सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रतेसह, अनुभव आणि भरतीच्या सर्व अटी शर्थी मान्य करणे आवश्यक आहे.
ही आहे आवश्यक कागदपत्रे –
अर्ज करणाऱ्या उमेदवराजवळ बायोडेटा, दहावी, बारावी आणि पदवी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला, आधारकार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
थेट मुलाखत –
या पदांसाठी पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या सोमवार ते शुक्रवार दरम्यान, मुलाखती घेण्यात येतील. ‘ए’ बिल्डिंग, अशोका बिझनेस एन्क्लेव्ह, पहिला मजला, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅकजवळ, नाशिक. येथे या मुलाखती पार पडणार आहे. तसेच भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.wnscareers.com/ यावर क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या