Top Recommended Stories

Karnataka Hijab Controversy: कर्नाटक हिजाब वादाचे पडसाद आता महाराष्ट्रात, मुस्लिम संघटना उतरल्या रस्त्यावर

Karnataka Hijab Controversy: कर्नाटक राज्यातील उडपीमधील एका महाविद्यालयातून सुरू झालेल्या हिजाब वादाचे (Karnataka Hijab Controversy) पडसाद आता शेजारी असलेल्या महाराष्ट्रात (Maharashtra State) देखील उमटताना दिसत आहेत.

Published: February 8, 2022 9:28 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

karnataka hijab row, hijab row, hijab controversy, karnataka college students suspended hijab burqa, burqa, karnataka news, karnataka college protest, hijab protest
Shivamogga DC was quoted as saying in the report that the students were simply "threatened" and they were not officially suspended. (File photo for representational purpose)

Karnataka Hijab Controversy: कर्नाटक राज्यातील उडपीमधील एका महाविद्यालयातून सुरू झालेल्या हिजाब वादाचे (Karnataka Hijab Controversy) पडसाद आता शेजारी असलेल्या महाराष्ट्रात (Maharashtra State) देखील उमटताना दिसत आहेत. मुंबईसह राज्यातील काही शहरात हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लिम संघटना (Muslim Organization) रस्त्यावर उतरल्या आहेत.

Also Read:

मुंबईत हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लिम महिला (Muslim Women) रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी स्वाक्षरी कॅम्पेन (signature campaign) सुरू केले आहेत. मालेगावात मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनात रस्त्यावर उतरून घोषणा दिल्या. त्याचबरोबप राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आणि महिला सेलने शहरातून निषेध रॅली काढली. प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. कर्नाटक सरकारने ड्रेसकोड रद्द करावा आणि हिजाब व बुरख्यास परवानगी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.”

You may like to read

‘पहले हिजाब फिर किताब’, बीडमध्ये झळकले पोस्टर्स

दुसरीकडे, मराठवाड्यात देखील हिजाब वादाचे लोण पसरले आहे. बीड शहराच्या बशीर गंज चौकात ‘पहले हिजाब फिर किताब’ अशा आशयाचे पोस्टर्स झळकल्याचे पाहायला मिळाले. या पोस्टर्सची चर्चा केवळ शहरातच नाही, तर संपूर्ण राज्यात सुरू आहे. फारुखी लखमानी विद्यार्थी सेनेने (Farikhu Lakhmani Vidyari Sena) बशीर गंज चौकात ही पोस्टर्स लावण्यात आल्याचे समजते. ‘हर किमती चीज परदे में होती है’ ( Hijab is our Right) असे देखील या पोस्टर्सवर लिहिण्यात आले आहेत.

खासदार असादुद्दीन ओवैसी सरसावले…

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असादुद्दीन ओवैसी (AIMIM MP Asaduddin Owaisi) हे देखील हिजाबच्या समर्थनार्थ सरसावले आहे. कर्नाटकतील भाजप सरकारकडून (Karnataka BJP Government) राज्यघटनेची पायमल्ली सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच कर्नाटक सरकारचा निषेध केला आहे.

खासदार ओवैसी म्हणाले, आम्ही काय खायचे आणि काय परिधान करायचे, हे कोणतेही सरकार ठरवू शकत नाही. कर्नाटकातील भाजप सरकारने संविधानविरोधात जाऊन हा निर्णय घेतला आहे. मुस्लिम विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये हिजाब परिधान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचा ओवैसी यांनी कडाडून निषेध केला आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी देखील हिजाब वादात उडी घेतली आहे. खासदार फौजिया खान यांनी भाजपला टार्गेट केले आहे. देशात पाच राज्यात निवडणुका होत असून या पार्श्वभूमीवर राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

कर्नाटकातील उडपीमधील एका कॉलेजमधून हिजाब वादाला सुरूवात झाली होती. गेल्या जानेवारीत कॉलेज प्रशासनाने हिजाबवर बंदी घातली होती. हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिंनीना कॉलेजच्या गेटवर रोखण्यात आले होते. त्यानंतर कॉलेजच्या निर्णयाला एका विद्यार्थिनीने कर्नाटक हायकोर्टात आव्हान दिले होते. हिजाब परिधान करण्यास परवानगी द्या. कॉलेजचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे विद्यार्थिनीने केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 8, 2022 9:28 PM IST