पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या (Khed Panchayat Samiti in Pune) सभापतिपदाची निवडणूक अत्यंत चुरस आणि तणावपूर्ण वातावरणात पार पडली. शिवसेनेकडे (shivsena) बहुमत असतानाही खेड पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) सभापती झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण चौधरी (Arun Chaudhari) यांची सभापतीपदी निवड झाली आहे. शिवसेनेवर सभापतिपद गमावण्याची नामुष्की ओढाल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Minister Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thackeray) यांना धोबीपछाड दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.Also Read - शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ! निकटवर्तीय सईद खानला अटक

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या खेड पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण संभाजी चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे माजी सभापती भगवान नारायण पोखरकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेनेतील सदस्यामध्ये सभापतिपदावरुन मतभेद झाल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष झाला आणि याचदरम्यान झालेल्या हाणामारीमुळे दोन्ही पक्षनेतृत्त्वाकडे तक्रारी करण्यात आल्या आहे. Also Read - Health Department Exam: आरोग्य विभागाची परीक्षा कधी होणार?, आरोग्यमंत्र्यांनी सांगितली संभाव्य तारीख!

अखेर अजित पवारांची सरशी..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या खासदार संजय राऊत यांनी खेड तालुक्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. महाआघाडी सरकारच्या दोन पक्षाच्या नेतृत्त्व लढाईत अखेर अजित पवारांची सरशी ठरली, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. Also Read - तिसरी घंटा वाजणार! राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार

भगवान पोखरकरांच्या अर्जावर आक्षेप…

माजी सभापती भगवान पोखरकर हे कारागृहात असल्यानं ते पोलिस बंदोबस्तामध्ये निवड सभेला उपस्थित होते. पोखरकर यांनी सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला असता नागरिकांच्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्राची पडताळणी नसल्यावरून पोखरकर यांच्या अर्जावर अरुण चौधरी यांनी आक्षेप नोंदवला. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पोखरकर यांचा अर्ज अवैध ठरवला. नवनिर्वाचित सभापती अरुण चौधरी यांना शिवसेनेच्या बंडखोर 5 सदस्य तसेच भाजपचे उपसभापती चांगदेव शिवेकर यांचा पाठिंबा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 5 बंडखोर सदस्यांना पोखरकर यांना मतदान करण्यासाठी आदेश दिला होता. मात्र, निवडणूक बिनविरोध झाल्यानं या आदेशाचा काही एक उपयोग झाला नाही.

101 दिवस सर्व सदस्य राजकीय सहलीवर…

खेड पंचायत समिती सभापती निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. कारण तब्बल तीन महिनं अर्थात 101 दिवस पंचायत समितीचे सर्व सदस्य राजकीय सहलीवर होते. अविश्वास ठराव मंजुरी व त्या दरम्यान झालेल्या अनेक राजकीय घडामोडी, न्यायालयीन दखल यामुळे हा अविश्वास ठराव चांगलाच गाजला होता. त्यात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यात यावरून राजकीय कलगीतुरा रंगला होता.

भगवान पोखरकरांसह 20 जणांविरुद्ध गुन्हा

खेड पंचायत समितीत शिवसेना व मित्रपक्ष मिळून 14 पैकी 10 सदस्यांचे बहुमत आहे. इतरांना संधी मिळावी म्हणून माजी सभापती भगवान पोखरकर यांनी राजीनामा द्यावा, असा आग्रह धरला. यावरून शिवसेनेच्या 6 सदस्यांनी बंडखोरी केल्याचं स्पष्ट झालं. एक सदस्य स्वगृही परतला. 5 सदस्यांनी आमदार मोहिते पाटील यांच्या आश्रयाला जाणे पसंत केलं. या सगळ्या प्रकारावरून संतापलेल्या भगवान पोखरकर यांनी गोंधळ घातला. त्यावरून पोखरकरांसह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.