By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Kirit Somaiya And Nilesh Rane Arrested: किरीट सोमय्या आणि निलेश राणेंना दोपोली पोलिसांनी अटक करत जिल्ह्याबाहेर सोडले!
Kirit Somaiya And Nilesh Rane Arrested: अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्यासाठी किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत 'चलो दापोली'चा नारा दिला होता. त्याप्रमाणे किरीट सोमय्या हे शनिवारी दापोलीमध्ये दाखल झाले. त्यांनी पोलिसांकडे या रिसॉर्ट प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली पण पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतला नाही.

Kirit Somaiya And Nilesh Rane Arrested: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे दापोली येथील साई रिसॉर्ट (Sai Resort Dapoli) पाडण्यासाठी आलेल्या भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांना दापोली पोलिसांनी अटक केली. अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्यासाठी किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत ‘चलो दापोली’चा नारा दिला होता. त्याप्रमाणे किरीट सोमय्या हे शनिवारी दापोलीमध्ये दाखल झाले. त्यांनी पोलिसांकडे (Dapoli Police) या रिसॉर्ट प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली पण पोलिसांनी एफआयआर (FIR Agaist Anil Parab) नोंदवून घेतली नाही. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या आणि नितेश राणे यांना रिसॉर्टच्या दिशेने जाऊन सुद्धा दिले नाही. त्यामुळे किरिट सोमय्या, नितेश राणे आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
पोलिसांसोबत वाद झाल्यानंतर किरिट सोमय्या आणि निलेश राणे यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. जोपर्यंत अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत याठिकाणावरुन हालणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. पण त्यानंतर पुन्हा किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रिसॉर्टकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना अडवले आणि दोघांनाही अटक केली. किरीट सोमय्या हे दापोलीमध्ये येण्यापूर्वीच दापोली पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली होती. या जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांच्याविरोधात कारवाई करत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितले की, ‘आमचा सत्याग्रह यशस्वी झाला आहे.’ पोलिसांनी अटक करुन आम्हाला रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात येणार असल्याचे देखील ते म्हणाले. दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्या निशाण्यावर महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi Government) नेते आणि मंत्री आहेत. एकापाठोपाठ एका नेत्यावर किरीट सोमय्या आरोप करत असून त्यांचे घोटोळे बाहेर काढण्याचा इशारा देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता शिवसेनेचे नेते अनिल परब हे सोमय्यांच्या रडारवर आहेत. किरिट सोमय्या यांनी आता अनिल परब यांचे दापोली (Dapoli) येथील साई रिसॉर्ट वेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि हे रिसॉर्ट तोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या