Kirit Somaiya Car Attack: किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, गाडीच्या काचा फुटून सोमय्या जखमी
Kirit Somaiya Car Attack: खार पोलिसांनी (Khar Police) नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्या त्यांना भेटण्यासाठी आले आणि आक्रमक शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूची काच फुटली आणि सोमय्या यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली.

Kirit Somaiya Car Attack: अमरावतीचे खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MP Ravi Rana) यांना खार पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. राणा दाम्पत्यांना भेटण्यासाठी भाजपचे खासदार किरीट सोमय्या (BJP MP Kirit Somaiya) यांनी रात्री खार पोलिस ठाण्यात धाव घेतली. राणा दाम्पत्यांची भेट झाल्यानंतर किरीट सोमय्या हे पोलिस ठाण्याबाहेर (Khar Police Station) येत असताना बाहेर उभ्या राहिलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर हल्ला केला. शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक आणि चप्पल फेक केली. शिवसैनिकांच्या या हल्ल्यामध्ये सोमय्या यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आणि ते किरकोळ जखमी झाले.
Also Read:
राणा दाम्पत्यांच्या भेटीला आलेल्या किरीट सोमय्या यांना शनिवारी शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते. मातोश्रीबाहेर आणि रवी राणांच्या बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत आंदोलन केले. अशामध्ये रवी राणा यांनी जाहीर केलेलं आंदोलन मागे घेतले. पण त्यानंतर खार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्या त्यांना भेटण्यासाठी आले आणि आक्रमक शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूची काच फुटली आणि सोमय्या यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली.
शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडीवर चप्पलफेक करत शिवीगाळ सुद्धा केला. या घटनेमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद सुरु झाला आहे. या घटनेनंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘पोलिसांच्या उपस्थितीत मला मारहाण केली. पोलिसांच्या उपस्थितीत गुंड पोलfस स्टेशनच्या आवारात शिरतात. शिवसैनिकांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होत नाही, तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हलणार नाही.’ दरम्यान, किरीट सोमय्यांच्या ड्रायव्हरने आपल्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या