Top Recommended Stories

किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौरांसह 4 नगरसेवकांना अटक आणि सुटका

Kirit Somaiya Case: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला प्रकरणी पोलिसांनी सोमवारी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह चार नगरसेवकांना अटक केली आणि त्यानंतर लगेच सुटका देखील करण्यात आली. चौघांवरही जामीनपात्र गुन्हे असल्याने योग्य ती कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Published: April 25, 2022 9:16 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौरांसह 4 नगरसेवकांना अटक आणि सुटका
Attack on Kirit Somaiya

Kirit Somaiya Case: भाजप नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) गाडीवर शनिवारी रात्री दगडफेक करण्यात आली होती. खार पोलिस स्टेशनबाहेर हा हल्ला (Attack on Kirit Somaiya) झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी शहराचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Viswanath Mhadeshwar) यांना अटक केली आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. महाडेश्वर यांच्यासोबतच खार पोलिसांनी तीन नगरसेवकांना देखील अटक केली होती. यामध्ये चंद्रशेखर वायंगणकर (Chandrasekhar Waingankar), दिनेश कुबल (Dinesh Kubal) आणि हाजी हालीम खान (Haji Halim Khan) या 3 माजी नगरसेवकांचा समावेश होता. मात्र अटकेनंतर लगेचच त्यांची सुटका करण्यात आली. चौघांवरही जामीनपात्र गुन्हे असल्यानं पोलिसांनी कागदपत्रं सादर केल्यानंतर त्यांची सुटका केली. या चौघांच्या नेतृत्वात शिवसैनिक (Shiv Sainiks) तिथे जमा झाले होते अशा तक्रारीनंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Also Read:

दरम्यान, शनिवारी रात्री खार पोलिस स्टेशनबाहेर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, चंद्रशेखर वायंगणकर, दिनेश कुबल आणि हाजी हालिम खान या चार माजी नगरसेवकां देखील अटक केली. पोलिसांच्या वतीनं या चारही जणांवर लावण्यात आलेली कलमे ही जामिनपात्र होती. त्यामुळे योग्य ती कायदेशीर कागदपत्रे सादर केल्यानंतर पोलिसांनी त्यांना टेबल जामिन मंजूर केला. या प्रकरणात आणखी काही शिवसैनिकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

You may like to read

या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने माफिया सेनेचे सरदार उद्धव ठाकरे दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत याची माहिती आम्ही केंद्रीय गृहसचिवांना देणार आहोत, असे सोमय्या म्हणाले. पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्रात गुंडगिरी सुरू असल्याची तक्रार त्यांच्याकडे करणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

दरम्यान, शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजपाचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले. या शिष्टमंडळात भाजपच्या पाच आमदारांचा समावेस आहे. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन सोमय्या शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी तक्रार करणार आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 25, 2022 9:16 PM IST