Maharashtra Rainfall: राज्यावर पावसाचं सावट, या जिल्ह्यात पुढचे चार दिवस मेघगर्जनेसह पडणार पाऊस!

राज्यातील किमान तापमानात किंचितशी वाढ झाली असून पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे.

Updated: January 6, 2022 12:43 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Rain alert in maharashtra
Rain alert in maharashtra

Maharashtra Rainfall: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट (Cold wave) पसरली आहे. थंडीने अक्षरश: सर्वांना हुडहुडी भरली आहे. अशामध्ये आता हिवाळ्यात (winter) पुन्हा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील किमान तापमानात किंचितशी वाढ झाली असून पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने (weather department) वर्तवली आहे.

Also Read:

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढचे चार दिवस राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. हवामान खात्यातून अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. त्याचसोबत गुरुवारी म्हणजे आज धुळे (dhule) आणि नंदुरबार (Nandurbar) या दोन जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून पुढच्या 24 तासांत या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर उद्या म्हणजे 7 जानेवारीपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

उद्या म्हणजे शुक्रवारी नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावासाचा आंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर 8 आणि 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), उत्तर कोकण (North Kokan), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidharbha) अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 8 जानेवारीला ठाणे, पालघर, उत्तर महाराष्ट्र, विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. तर 9 जानेवारीला मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

9 जानेवारी म्हणजे रविवारी वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नगापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 9 जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच, पावसामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 6, 2022 12:16 PM IST

Updated Date: January 6, 2022 12:43 PM IST