पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचं मुळगाव काटेवाडीमध्ये ( ता. बारामती ) 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. (Lockdown In Katewadi) काटेवाडीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं गावकऱ्यांच्या पुढाकारानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पुढील 7 दिवस गावात शंभर टक्के बंद पाळण्यात येणार आहे. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहे.Also Read - IND vs ENG : टीम इंडियाला धक्का, रोहित शर्मा कसोटीतून बाहेर, जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद

काटेवाडीत (Lockdown In Katewadi) दोन दिवसांपूर्वी अँटीजेन टेस्ट कॅम्प (Antigen Test Camp) घेतला होता. त्यात 27 नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वयंस्पूर्तीने 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. Also Read - COVID-19 Vaccine : मोठा निर्णय! आता कोणत्याही वयोगटातील नागरिकांना मिळणार लस, देशातील पहिल्या m-RNA लसला मंजुरी

दुसरीकडे, राज्यात कोरोनाव्हायरसची ( Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, कोरोनाचा न्यू व्हेरिएंट डेल्टा प्लसचं (Delta Plus Variant) संकट आलं आहे. राज्यात 21 रुग्ण आढळून आल्यानं नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आहे. Also Read - Rohit Sharma Daughter Video : रोहित शर्माच्या मुलीने बोबडे बोलत दिली वडिलांच्या तब्बेतीची अपडेट, व्हिडिओ झाला व्हायरल

राज्यावर पुन्हा कठोर निर्बंध लागू होणार-

कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे राज सरकारनं अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबईसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लॉकडाऊनचे (Lockdown) निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. अशात आता डेल्टा प्लस विषाणूनं सरकारच्या चिंतेत वाढ केली आहे. राज्यामध्ये या विषाणूचे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या भीतीत आणखी वाढ झाली आहे.

नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहे, बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही परिस्थिती लक्षात घेता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध (Strict restrictions) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कोरोनाबाबतचा आढावा घेण्यात आला. काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यानुसार निर्बंध शिथिल करण्याच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यासोबतच दुकानांच्या वेळा पुन्हा कमी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.