महाड : कोकणात पावसाने (Heavy rainfall) कहर केला आहे. या पावसामुळे रत्नागरी (Ratnagiri), रायगड (Raigad), सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या (Landslide) घटना घडल्या आहेत. त्यामधील सर्वात मोठी घटना महाडमध्ये घडली आहे. दरड कोसळून महाडमधील (Mahad) तळीये गाव पूर्णत: गुडूप झाले आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 44 जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 50 पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.Also Read - Breaking News Live Updates: "देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात"; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

Also Read - Breaking News Live Updates: चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री; काँग्रेस हायकमांडकडून नावावर शिक्कामोर्तब

रायगड (Raigad) जिल्ह्यात इतर ठिकाणी ही दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तळीये गाव आणि दरड कोसळून इतर ठिकाणी झालेल्या दुर्घटनास्थळी एनडीआरएफची टीम (NDRF Team) आणि स्थानिक प्रशासनामार्फत बचावकार्य सुरु आहे. शनिवारी सकाळपर्यंत ढिगाऱ्याखाली दबलेले 44 मृतेदह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, दोन ठिकाणावरुन हे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी (Raigad District Collector Nidhi Chaudhary ) यांनी दिली आहे. तर दरड दुर्घटनेत आतापर्यंत 35 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आणखी 50 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली आहे. Also Read - Breaking News Live Updates: पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

गेल्या चार दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावावर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास दरड कोसळली. पण या घटनेची माहिती उशिरा कळाली. मुसळधार पावसामुळे या गावाकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्या होत्या तसंच रस्ता देखील खचला होता. त्यामुळे घटनास्थळी पोहचण्यात अनेक अडचणी येत होत्या. पण प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहचून मदत कार्य करेपर्यंत उशीर झाला होता. या गावातील सर्वच्या सर्व घरांवर दरड कोसळून संपूर्ण गावच नष्ट झाले. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.

दरम्यान, दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र (Central Government) आणि राज्य सरकारने (Maharashtra Government) मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहेत. तर इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.