मुंबई: देशातील सर्व राज्यांनी 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल ( 12th Board Result) जाहीर करावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळानं निकालाचा मूल्यमापनाचा आराखडा अर्थात फॉर्म्युला ठरवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बारावीचा अंतिम निकाल (12th results) दहावी, अकरावी आणि बारावीच्या पूर्व बोर्डच्या निकालाच्या आधारीत असणार आहे.Also Read - What is Floor Test: काय असते बहुमत चाचणी? महाराष्ट्र सरकारवर का आली ही वेळ; जाणून घ्या, एका क्लिकवर...

सीबीएसईच्या (CBSE) धर्तीवर राज्यातही बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला (Result Formula) ठरवण्यात आला आहे. यासंदर्भातली शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thackeray) यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Maharashtra Education Minister Varsha Gaikwad) अंतिम निर्णय जाहीर करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. Also Read - CM Uddhav Thackeray floor test: ठाकरे सरकारची उद्या अग्निपरीक्षा! जाणून घ्या... एकनाथ शिंदे गटात कोण-कोणते आमदार?

राज्यातील इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता गुण देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला निकालाचा फॉर्म्युला निश्चित करण्यास सांगितले होते. त्यावर तज्ज्ञांच्या अनेक बैठका होऊन फॉर्म्युला निश्चित झाल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले आहे. त्यानुसार यंदा 12 वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा महाराष्ट्राने रद्द केल्याची घोषणा 3 जून रोजी केली होती. Also Read - Building collapsed at Kalyan: मुंबईतील कुर्ल्यानंतर कल्याणमध्ये कोसळली इमारत; एकाचा मृत्यू, दोघे सुखरुप

नेमका काय आहे निकालाचा ‘फॉर्म्युला’

10 वी, 11 वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षा व प्रॅक्टिकलच्या आधारे हे गुण दिले जाणार आहे. त्यासाठी 20: 40: 40 असा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती मिळाली आहे. 10 वीचे 20 टक्के गुण, 11 वीचे 40 टक्के गुण आणि इयत्ता 12 मधील अंतर्गत परीक्षा व प्रॅक्टिकल असे 40 टक्के गुण विचारात घेण्यात येणार आहेत. या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ निकाल जाहीर करणार आहे.

दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) जुलैअखेपर्यंत 12 वीचा निकाल (CBSE 12th result 2021) जाहीर करण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टात सांगितले आहे. त्याचवेळी मूल्यमापनाचा आराखडा, त्यासाठीचे नियोजनही जाहीर केले. त्या अनुषंगाने सर्वच राज्य मंडळांनी 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करावा, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.