Top Recommended Stories

Maharashtra Budget 2022: 'या' तारखेला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प, GST बाबत अजित पवारांनी दिली मोठी माहिती

Maharashtra Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) येत्या 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) मांडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माहिती दिली.

Updated: January 26, 2022 2:19 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Maharashtra Budget 2022: 'या' तारखेला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प, GST बाबत अजित पवारांनी दिली मोठी माहिती

Maharashtra Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) येत्या 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) मांडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माहिती दिली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन् (Nirmala Sitharaman) जो अर्थसंकल्प (Budget 2022) मांडतील, त्यानंतर प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री, सहकारी यावर चर्चा करतात. अर्थसंकल्पात राज्याला किती सवलती मिळाल्या, किती वेगवेगळ्या योजना मिळाल्या यासंबंधी चर्चा केली जाणार असल्याची देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

Also Read:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील…

अजित पवार म्हणाले, जीएसटीच्या (GST) स्वरुपात केंद्र सरकार जे पैसै राज्यांना देत होते, ते यावर्षीपासून बंद करण्यात येणार आहे. सुरुवातीची पाच वर्षे हे पैसे द्यायचे असे ठरले होते. पण, देशात कोरोनाकाळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे पैसै आणखी दोन वर्षे द्यावेत, अशी राज्य सरकारची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील.

You may like to read

राज्याचा भांडवली खर्च किती? गेल्या तीन महिन्यात राज्याला किती उत्पन्न मिळाले, याबाबत माहिती घेण्याची काम सुरू आहे. कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्याला उत्पन्नाचे नवे स्तोत्र शोधावे लागणार आहेत. नवीन कोणते कर आगामी अर्थसंकल्पात वाढवण्यात येणार आहेत, हे सांगता येत नाही. पण उत्पन्नाचे स्तोत्र वाढवणे, महसुलाची गळती रोखणे यासाठी प्रयत्न आतापासूनच सुरु करण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून राज्याला जीएसटीच्या परताव्याच्या पोटी येणार असलेले सगळे पैसै अजून मिळालेले नाहीत, असे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यात जमा होणाऱ्या जीएसटीची निम्मे रक्कम केंद्र सरकारकडे जाते. त्याबाबत अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आढावा घेण्यात आला आहे. कॅबिनेटमध्ये हा मुख्य मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मीच या मुद्द्याला हात घालणार आहे. राज्यावर गेल्या दोन वर्षांपासून संकटांची मालिका सुरूच आहे. संकटातून मार्ग काढण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या