Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात, मार्च महिन्यात तिसरी लाट संपणार!
Maharashtra Corona Update: राज्यातील कोरोना आकडेवारीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसत आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध कमी करण्याकडे सरकारचा कल असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Maharashtra Corona Update: राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Patient) आणि मृतांमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना (Corona Virus) रुग्णांची संख्या आणि मृत्यू दर कमी होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे लक्षात घेता राज्य सरकारने (Maharashtra Government) अनेक निर्बंधांमध्ये सूट दिली आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालय देखील सुरु झाली आहेत. अशामध्ये कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी कोरोनाची तिसरी लाट (Third Wave Of corona) येत्या मार्च महिन्यात संपेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Also Read:
जालन्यामध्ये पत्रकारांनी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘कोरोना संसर्गाच्या चढत्या आलेखाला आता उतार लागल्याचे दिसत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील कोरोनाची तिसरी लाट संपेल.’ तसंच, कोरोना परिस्थितीवर मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) आढावा बैठक पार पडली. त्यातील आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना आकडेवारीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसत आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध कमी करण्याकडे सरकारचा कल असल्याचे त्यांनी सांगितले.
‘राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या 48 हजारांच्या आसपास होती. ती आता 10 ते 15 हजारांवर आली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणतेही निर्बंध वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार नाही. तर सरकारकडून लावण्यात आलेले निर्बंध टप्प्या-टप्प्याने कमी होत आहेत. दर आठवड्याला निर्बंध कमी होत असल्याचे यापुढे तुम्हाला पाहायला मिळेल. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत आपण तिसऱ्या लाटेच्या शेवटाकडे जाऊ असे तज्ज्ञांच्या मतावरून आम्हाला वाटत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मार्च अखेरीस खूप कमी होईल, असा विश्वासही आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या