Top Recommended Stories

Maharashtra Crime News: माता न तू वैरिणी! हृदय पिळवटणारी घटना... जन्मदात्या आईने 6 मुलांना विहिरीत फेकले

Maharashtra Crime News: एका निर्दयी आईने आपल्या पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलले. यात सहाही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 मुली आणि 1 मुलाचा समावेश आहे.

Published: May 31, 2022 10:59 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Maharashtra Crime News: माता न तू वैरिणी! हृदय पिळवटणारी घटना... जन्मदात्या आईने 6 मुलांना विहिरीत फेकले
1 dead and several injured after a car crashed into a fundraiser(Representational Image)

Maharashtra Crime News: एका निर्दयी आईने आपल्या पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलले. यात सहाही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 मुली आणि 1 मुलाचा समावेश आहे. मुलांना मारल्यानंतर महिलेने स्वत: ही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Also Read:

हृदय पिळवटणारी घटना रायगड (Raigad News) जिल्ह्यातील महाड तालुक्यातल्या (Mahad) बिरवाडी गावात घडली आहे. या महिलेने मुलांना का मारलं यामागील कारण अद्याप समोर आले नाही. परंतु पतीच्या दारूच्या त्रासाला कंटाळून महिलेने हे पाऊल उचलल्याची गावात चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस (Raigad Police) आणि गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक आमदार भरत गोगावलेही (MLA Bharat Gogavale) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

You may like to read

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी निर्दयी आईला ताब्यात घेतल आहे. तर सहाही मुलांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले आहेत. महिलेचा पतीसोबत सोमवारी सायंकाळी वाद झाला होता. त्यानंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास महिलेने घराशेजारील विहिरीत पोटच्या सहाही मुलांना फेकले आणि त्यानंतर स्वत:ही उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पतीच्या दारूच्या त्रासाला कंटाळून महिलेने केले कृत्य…

महिलेने पतीच्या दारूच्या त्रासाला कंटाळून आपल्या पोटच्या सहा मुलांना विहिरीत फेकले. यात पाण्यात बुडून सहाही मुलांचा मृत्यू झाला. मुलांना मारल्यानंतर महिलेने स्वत:ही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश मिळाले. रश्मी चिखुरी साहनी (वय-10), करिष्मा चिखुरी साहनी (वय-8), रेश्मा चिखुरी साहनी (वय-6), विद्या चिखुरी साहनी (वय-5), शिवराज चिखुरी साहनी (वय-3) आणि राधा चिखुरी साहनी (1.5 वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.