Top Recommended Stories

Maharashtra Crime: पोटचा मुलगा निघाला वैरी! फक्त 900 रुपयांसाठी जन्मदात्या बापाची हत्या

Maharashtra Crime: राज्यात गुन्हेगारीच्या घटना (Crime News) पुन्हा वाढल्या आहेत. अशातच वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यात (Palghar District) मुलाने फक्त 900 रुपयांसाठी वृद्ध वडिलांची हत्या (Fathers Murder) केली.

Published: February 7, 2022 4:32 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Maharashtra Crime: पोटचा मुलगा निघाला वैरी! फक्त 900 रुपयांसाठी जन्मदात्या बापाची हत्या
Representative Image

Maharashtra Crime: राज्यात गुन्हेगारीच्या घटना (Crime News) पुन्हा वाढल्या आहेत. अशातच वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यात (Palghar District) मुलाने फक्त 900 रुपयांसाठी वृद्ध वडिलांची हत्या (Fathers Murder) केली. पोलिसांनी आरोपी मुलाच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. रवींद्र माळी (वय-35 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पैशासाठी वडिलांना बेदम मारहाण केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Also Read:

जिल्हा ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवाहर भागातील रंजनपाडा येथे ही घटना घडली. आरोपीने त्याच्या 70 वर्षीय वडिलांची फक्त 900 रुपयांसाठी हत्या केली. जानू माळी असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून 900 रुपये काढले होते. एका सरकारी योजनेतून ते त्यांना महिन्याकाठी मिळत होते. आरोपीचा वडिलांच्या पैशावर डोळा होता. आरोपीने वडिलांना 900 रुपये मागितले. परंतु ते देण्यास त्यांनी नकार दिला. त्यावरून आरोपी मुलाने आपल्या वृद्ध वडिलांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत जानू माळी यांना मोखाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु तिथे त्यांची प्रकृती जास्त खालावली. पुढील उपचारासाठी त्यांनी नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुलगा रवींद्र माळी याला अटक केली आहे.

You may like to read

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात वाघोबा खिंडच्या झुडपात एका महिला मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

दुसरीकडे, औरंगाबादेत खुनी थरार पाहायला मिळाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दहेगाव बंगला परिसरात एका 24 वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. वडील झोपलेले असताना आरोपी मुलाने त्यांच्या पोटात, छातीत आणि गुप्तांगावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यातच वडिलांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी थोरला मुलगा कामावरून घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

कडूबाळ सोनवणे असं हत्या झालेल्या 55 वर्षीय वडिलांचं नाव आहे. तर अनिल कडूबाळ सोनवणे असे आरोपीचे नाव आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 7, 2022 4:32 PM IST