Top Recommended Stories

मोठी बातमी! Eknath Shinde गटाला झटका, विधिमंडळ गटनेतेपदी अजय चौधरी यांना मान्यता, आता कारवाई...

Maharashtra Crisis: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पारडे जड होत असताना त्यांना मोठा झटका देणारी घडामोड घडली आहे. ती म्हणजे विधिमंडळ गटनेतेपदी अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांना मान्यता देण्यात आली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरपळ (Vidhansabha Speaker Narhari Shirpal) यांच्या आदेशानुसार अजय चौधरी यांच्या नावाची यादीत नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे 12 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या (disqualification) शिवसेनेच्या मागणीवर सुनावणी होण्याची शक्यता आहे."

Published: June 24, 2022 1:12 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Eknath Shinde
Eknath Shinde

Maharashtra Crisis: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याच्या गटात आतापर्यंत शिवसेना आणि अपक्षाच्या 42 आमदारांना आपल्या गटात सामील करून घेतले आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे पारडे जड होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात सध्या तरी शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच एकनाथ शिंदे यांना मोठा झटका देणारी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, विधिमंडळ गटनेतेपदी अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांना मान्यता मिळाली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरपळ (Vidhansabha Speaker Narhari Shirpal) यांच्या आदेशानुसार अजय चौधरी यांच्या नावाची नोंद यादीत करण्यात आली आहे. त्यामुळे 12 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर लवकरच सुमावणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Also Read:

12 बंडखोर आमदार अपात्र ठरणार?

विधिमंडळाच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांना मान्यता मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटाला धोका निर्माण झाला आहे. फुटलेल्या 12 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत शिवसेनेने मागणी केली आहे. त्यानुसार आज सुनावणी होणार आहे. अपात्र आमदारांना नोटिस बजावण्यात येणार आहे. एके दिवशी 4 आमदारांची सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे 12 बंडखोर आमदार अपात्र ठरणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित न राहिलेल्या आमदारांवर ही कारवाई करण्यात येणार आहे.

You may like to read

विधानमंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेकडून अपात्रतेबाबत विधानसभा उपांध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष त्या 12 आमदारांना नोटीस बजावती. संबंधित आमदारांना नोटिस बजावल्यानंतर त्या आमदारांचे नेमकं काय करायचं याबाबत विधानसभा उपाध्यक्ष याबाबत निर्णय घेतील. कोरोनानंतरदेखील आमदारांना ऑनलाईन सुनावणी घेण्याबाबत देखील निर्णय घेण्यात येईल. आमदार ऑनलाईन उपस्थित राहू इच्छित असतील तर त्यासाठी नॅशनल इनफॉरमेटिक सेंटरकडून देण्यात आलेल्या बँडविडथचा वापर करावा लागणार आहे.पण सध्या बँडविडथची उपलब्धता पाहाता एका दिवशी केवळ 4 आमदारांची सुनावणी होऊ शकते. आमदारांचे नेमके काय म्हणणे आहे, हे देखील जाणून घेण्यात येईल. ही अर्धन्यायिक प्रक्रिया असून त्यासाठी विशिष्ट वेळेची मर्यादा नाही.पंरतु, ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी विधिमंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

एकनाथ शिंदेच्या गळाला आणखी एक आमदार!

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आणखी मोठा होत चालला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कट्टर समर्थक आमदार दिलीप लांडे आता नॉट रिचेबल आहेत. आमदार लांडे यांचा फोन लागत नाही, ते नेमके कुठे गेले, हाच सगळ्यांना प्रश्न पडला आहे. आमदार लांडे हे मुंबईतील चांदिवलीचे आमदार आहेत. आमदार लांडे हे एकनाथ शिंदे गटात सामिल होणार, असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या