Top Recommended Stories

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीमध्ये - Maharashtra Day 2022 Wishes In Marathi

Maharashtra Day 2022 Wishes In Marathi : महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त सर्वजण आपल्या जवळच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना मॅसेज करुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा (Maharashtra Day 2022 Wishes In Marathi) देतात. तुम्ही सुद्धा या दिवशी आपल्या मित्र परिवाराला मराठीमध्ये महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करा...

Published: April 30, 2022 3:23 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Maharashtra Day 2022 Wishes In Marathi
Maharashtra Day 2022 Wishes In Marathi

Maharashtra Day 2022 Wishes In Marathi : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) खूपच महत्वाचा आहे. महाराष्ट्र दिन हा दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) म्हणून घोषित करण्यात आला. 1 मे 1960 रोजी देशाला महाराष्ट्राच्या रुपाने नवे राज्य मिळाले. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers Day) म्हणून देखील साजरा केला जातो. महाराष्ट्रात प्रत्येक जण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटामध्ये महाराष्ट्र दिन साजरा करतात. महाराष्ट्र शासनातर्फे (Maharashtra Government) परेड, मिरवणुका काढल्या जातात. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त सर्वजण आपल्या जवळच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना मॅसेज करुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा (Maharashtra Day 2022 Wishes In Marathi) देतात. तुम्ही सुद्धा या दिवशी आपल्या मित्र परिवाराला मराठीमध्ये महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करा…

Also Read:

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

61 व्या महाराष्ट्र दिनाच्या
तमाम महाराष्ट्रवासियांना हार्दिक शुभेच्छा!
जय महाराष्ट्र !

महान संतांची जन्मभूमी,
विज्ञानाने जेथे केली प्रगती
प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी
हीच आहे आमची संस्कृती.
जय महाराष्ट्र जय भारत…!

माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय,
रयतेचे छत्रपती आमचा शिवराय…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…
गुणगुणलो जे गीत गीत मराठी….
मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

दारिद्र्याच्या उन्हात शिजला,
निढल्याच्या घामाने भिजला,
देश गौरवासाठी झिजला,
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन आणि कामगार दिन
निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा..!

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा,
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा,
आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!

दरी दरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
कामगार दिन व महाराष्ट्रदिन
निमित्त सर्व नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा..!

शिक्षणाचे माहेरघर,
उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट
असा हा माझा
महाराष्ट्र आहे महान…
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!


You may like to read

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 30, 2022 3:23 PM IST