मुंबई : राज्यातील महिला पोलिसांसाठी (women police) आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) महिला पोलिसांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास आता कमी होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने  (Mahavikas Aghadi Government) महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 तासांवरुन वरुन 8 तास करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे (Maharashtra DGP Sanjay Pandey) यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.Also Read - Mumbai Local Update: 28 ऑक्टोबरपासून मुंबईची लाईफलाईन पूर्ण क्षमतेने धावणार, मध्य-पश्चिम रेल्वेवर 100 टक्के लोकल फेऱ्या!

Also Read - Breaking News Live Updates: NCBच्या बॉलिवूडवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार : नवाब मलिक

एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पोलिस दलामध्ये (police force) कर्तव्य बजावणाऱ्या महिलांना बारा तास काम करावे लागत आहे. महिला पोलिसांना त्याच्या कामासोबत कौटुंबिक जबाबदारी (Family responsibilities) देखील पार पाडावी लागत आहे. बऱ्याच वेळा सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरापासून अनेक वेळा या महिला पोलिसांना 12 तासांपेक्षा जास्त तास आपले कर्तव्य बजवावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यावर आणि कौटुंबिक जबाबदारीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या हितासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. Also Read - Breaking News Live Updates: मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, आई देखील कोरोनाबाधित, घरीच उपचार सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी देखील याबाबत ट्वीट करत सरकारचे मनापासून आभार मानले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलिस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणं शक्य होणार आहे.’ तसंच, हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walase-Patil) यांच्यासह सर्व मंत्रीमंडळाचे त्यांनी आभार मानले आहे.