मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board) बारावीच्या निकालाची (Maharashtra HSC Result 2021) प्रतिक्षा आता संपली आहे. आज, 3 ऑगस्टला (मंगळवारी) दुपारी निकाल (HSC Result 2021) जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन आपला निकाल पाहता येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.Also Read - Maharashtra HSC Result 2021: राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर; 99.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; असा पाहा तुमचा निकाल

शिक्षण मंडळानं गेल्या महिन्यात 16 तारखेला 10 वीचा निकाल (Maharashtra SSC Result 2021) ऑनलाईन जाहीर केला होता. तेव्हापासून 12 वीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. Also Read - Maharashtra HSC Result 2021: 12वीचा निकाल पाहण्यास तांत्रिक अडचण असल्यास हे पर्याय वापरू पाहा Result

12 वीचे विद्यार्थी किंवा पालकांना घरबसल्या ऑनलाईन निकाल पाहाता येईल. शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahresult.nic.in वर निकाल पाहाता येणार आहे. Also Read - Maharashtra HSC Result 2021: 12 वीचा निकाल पाहाण्यासाठी येथे करा क्लिक, डाऊनलोडही करू शकतात Result


दरम्यान, सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे 10 वी आणि 12 वीची परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी 10 वी आणि 12 वीचा निकाल तयार करण्यासाठी विशेष मूल्यांकन पद्धत (Special Assessment system) वापरण्यात आली. दहावीचा निकालासाठी 50:30:20 हा फॉर्म्युला अमंलात आणण्यात आला. आता 12 वीच्या निकाल 40:30:30 या फॉर्म्युलानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, CBSE देखील या फॉर्म्यु्ल्यानुसार, 12 वीचा निकाल जाहीर करणार आहे.

तुम्ही असा पाहू शकता Result-

– विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट म्हणजेच mahahsscboard.maharashtra.gov.in ला भेट द्यावी लागेल.

– वेबसाईटवर ‘महाराष्ट्र HSC निकाल 2021’ या लिंकवर क्लिक करा. (निकाल जाहीर झाल्यानंतर ही लिंक अॅक्टिव्ह होईल).

– विद्यार्थ्यांनी आपला 12 वीचा रोल नंबर टाकावा आणि सबमिट बटणवर क्लिक करावे.

– ‘महाराष्ट्र HSC निकाल 2021’ अशी फ्रेम स्क्रीनवर दिसेल.

– विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा निकाल पाहून. मार्क सर्टिफिकेट ‘डाऊनलोड’ करु शकता.