मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) गेल्या आठवड्यात 10 वीचा निकाल (Maharashtra SSC Result 2021) ऑनलाईन जाहीर केला. त्यानंतर आता बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची (Maharashtra HSC Result 2021) प्रतीक्षा लागली आहे. 12वीचा निकाल 30 जुलैला जाहीर होता पण आता या निकालासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. बारावीचा निकाल (HSC Result) आज नाही तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे.Also Read - Maharashtra 10th-12th Supplementary Exam Result 2022 : प्रतीक्षा संपली! 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, असे पाहा मार्क्स

12 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत ऑनलाईन जाहीर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दिले आहेत. कोर्टाच्या निर्देशानुसार शिक्षण मंडळानं निकाल तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. शिक्षण मंडळाने दिलेली माहिती अशी, की 12 वीच्या निकाल (Maharashtra HSC Result 2021) तयार करण्याचं काम सुरू असून जुलै महिन्यातच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती (Flood Situation) असल्यानं निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशीरा लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. Also Read - 10th-12th Supplementary Exam 2022 : नापास झालेल्या 10वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक संधी, पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर!

जुलै अखेरीस बारावीचा निकाल लागेल असे सांगण्यात आले होते. पण राज्यात अनेक जिल्ह्यात पूर आल्यामुळे बोर्डाची प्रशासकीय काम राहिली आहेत. त्यामुळे निकाल ऑगस्ट महिन्यात लागणा असल्याचे सांगण्यात आले आहे. जरी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्याचे समजले असले तरी सुद्धा तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
दरम्यान, बारावीचे विद्यार्थी किंवा पालकांना घरबसल्या ऑनलाईन निकाल पाहाता येईल. शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahresult.nic.in वर निकाल पाहाता येणार आहे. Also Read - MSBSHSE 10th Result 2022: दहावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता, असा पाहा तुमचा स्कोअर

असा पाहू शकतात निकाल-

– तुम्हाला सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.maharashtra.gov.in ला भेट द्यावी लागेल.
– वेबसाईटवर ‘महाराष्ट्र HSC निकाल 2021’ या लिंकवर क्लिक करा. (निकाल जाहीर झाल्यानंतर ही लिंक अॅक्टिव्ह होईल).
– विद्यार्थ्यांनी आपला 12 वीचा रोल नंबर टाकावा आणि सबमिट बटनवर क्लिक करावे.
– ‘महाराष्ट्र HSC निकाल 2021’ अशी फ्रेम स्क्रीनवर दिसेल.
– विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा निकाल पाहून. मार्क सर्टिफिकेट ‘डाऊनलोड’ करु शकता.

दरम्यान, सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे 10 वी आणि 12 वीची परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी 10 वी आणि 12 वीचा निकाल तयार करण्यासाठी विशेष मूल्यांकन पद्धत (Special Assessment system) वापरण्यात आली. दहावीचा निकालासाठी 50:30:20 हा फॉर्म्युला अमंलात आणण्यात आला. आता 12 वीच्या निकाल 40:30:30 या फॉर्म्युलानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, CBSE देखील या फॉर्म्यु्ल्यानुसार, 12 वीचा निकाल जाहीर करणार आहे.