मुंबई: राज्यात कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या (Second Wave of Covid 19) लाटेचा जोर ओसरत आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta Plus Variant) धोका वाढला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक 21 रुग्ण आहे. धक्कादायक म्हणजे डेल्टा विषाणूनं राज्यात एक बळी घेतला आहे. रत्नागिरीत 80 वर्षाच्या महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. राज्य सरकारनं नवे निर्बंध (Restrictions Across The States) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या आदेशानुसार कोरोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेडची संख्या कितीही कमी झाली तरी यापुढे राज्यातील सर्व जिल्हे निर्बंधांच्या दृष्टीनं तिसऱ्या स्तरावरच असतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.Also Read - Eknath Shinde Not Reachable: उद्धव ठाकरेंच्या पुत्र प्रेमामुळे नाराज आहेत एकनाथ शिंदे.. जाणून घ्या शिवसेना आमदारांच्या मनातील खदखद!

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे टप्प्याटप्प्यानं अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आधी केलेल्या निकषांमध्ये आता महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महापालिकांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात ठेवण्याचा महत्त्वापूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेडची संख्या कितीही कमी झाली तरी यापुढे राज्यातील सर्व जिल्हे निर्बंधांच्या दृष्टीनं तिसऱ्या स्तरावरच असतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील आदेशापर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचं मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. Also Read - Maharashtra Political Crisis: Eknath Shinde यांची Facebook Post होतेय व्हायरल, भाजपमध्ये जाण्याचे दिले संकेत?

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे कठोर निर्बंध 5 टप्प्यांत शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहिला मिळत आहे. त्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. राज्यात रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा हा व्हेरिएंट अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचा प्रसार वेगानं होण्याची शक्यता असून प्रशासन सतर्क झाले आहे. राज्याच्या मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागानं तातडीनं नवे निर्बंध लागू करण्याबाबत आदेश काढले आहेत. Also Read - Raj Thackeray Health Update: राज ठाकरे यांच्या तब्बेतीबाबत मोठी अपडेट, 'हिप बोन'ची सर्जरी यशस्वी

काय आहेत नवे निर्बंध?

– राज्यातील सर्व जिल्हे निर्बंधांच्या दृष्टीनं तिसऱ्या टप्प्यातच असतील
– पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात
– पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लागू
– शॉपिंग मॉल आणि थिएटर्स उघडण्यास परवानगी नाही
– रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेनं सायंकाळी 4 वाजेपर्यंतच सुरू राहातील
– लोकल ट्रेनमधून प्रवासाची केवळ मेडिकल स्टाफ, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच मुभा
– सार्वजनिक ठिकाणे, उद्यानांमध्ये सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंतच फिरण्याची मुभा
– सरकारी कार्यालयात केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी
– विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त 50 पाहुण्यांना उपस्थित राहण्याची परवानगी
– अंत्य संस्काराला जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी