मुंबई : राज्यावर कोरोनाचे (Coronavirus) संकट कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) येण्याची शक्यता आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta plus Veriant) धोका लक्षात घेता राज्य सरकारने सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊनचे ( Maharashtra Lockdown) कठोर निर्बंध लागू केले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ‘ब्रेक द चेन’ (Break The chain) अंतर्गत लागू असलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करण्यात आला आहे. मुंबईशहर, उपनगर आणि ठाण्यासह राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये आजपासून स्तर तीनचे निर्बंध लागू असतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसंच, सरकारी आदेशांचे राज्यात सर्वत्र काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.Also Read - IND vs ENG : टीम इंडियाला धक्का, रोहित शर्मा कसोटीतून बाहेर, जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने (Maharashtra Government) जूनच्या पहिल्या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले होते. पण आता कोरोनाची तिसरी लाट आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचे ठरवले आहे. निर्बंध शिथिल केल्यामुळे रस्त्यावर नागरिकांची प्रचंड गर्दी, नियमांचे होणारे उल्लंघन, कोरोना रुग्णात झालेली वाढ, डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आढळलेले रुग्ण यासर्व गोष्टी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी (Cm Uddhav Thackeray) पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंधांमध्ये नेमके काय बदल करण्यात आले आहेत ते आपण पाहणार आहोत… Also Read - COVID-19 Vaccine : मोठा निर्णय! आता कोणत्याही वयोगटातील नागरिकांना मिळणार लस, देशातील पहिल्या m-RNA लसला मंजुरी

– नव्या निर्बंधानुसार पाच स्तराऐवजी राज्याची विभागणी तीन ते पाच स्तरात करण्यात आली आहे. Also Read - Rohit Sharma Daughter Video : रोहित शर्माच्या मुलीने बोबडे बोलत दिली वडिलांच्या तब्बेतीची अपडेट, व्हिडिओ झाला व्हायरल

– पहिल्या आणि दुसऱ्या स्तरातील सर्व जिल्हा आता तिसऱ्या स्तरात मोडतील.

– दुकाने आता सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंतच खुली राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद राहतील.

– सायंकाळी 5 नंतर विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

– उपहारगृहेही सायंकाळी ४ पर्यंतच खुली राहतील.

– कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड कारवाई केली जाईल.

– निर्बंध अधिक कठोर करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

– रुग्णसंख्या किंवा संसर्गदर कमी झाल्यास लगेचच निर्बंध शिथिल करता येणार नाहीत. दोन आठवड्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेऊनच निर्बंध स्थानिक पातळीवर शिथिल करता येतील.

– 100 पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर बंदी असेल.

– बांधकामाच्या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांहून अधिक संख्येने काम करता येणार नाही.

– मेळावा किंवा संमेलनाचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असणार नाही. याठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

– वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांना पूर्णपणे बंद करण्यात येईल. कोरोना असेपर्यंत त्यांना उघडण्याची मुभा नसेल.

– तीन, चार आणि पाचव्या स्तरातील धार्मिक स्तळं अभ्यागतांसाठी बंद असतील.

– लग्नकार्य आणि अंतिमसंस्काराच्या ठिकाणी जमावासाठी लागू असलेल्या नियमांची अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे.

– पर्यटनस्थळाच्या परिसरातील सर्व हॉटेल्ससाठी मार्गदर्शक तत्व लागू असतील.

– पर्यटन स्तर पाचमधून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला एका आठवड्यासाठी क्वारंटाईन राहावे लागेल

– पाहुण्यांसाठी सर्व स्तरातील हॉटेल्स उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. क्षमतेच्या अटीवर हॉटेलमधील उपाहारगृहे त्या ठिकाणी राहणाऱ्या पाहुण्यांसाठी सुरु ठेवण्यात येतील.

– विवाहसमारंभ, उपहारगृहे यामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी भरारी पथके नेमणून अशांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

– शाळा, महाविद्यलय आणि इतर शैक्षणिक संस्थांसाठी लागू असलेले नियम खासगी शिकवण्या आणि कौशल्य केंद्रांसाठी देखील लागू असतील.