Maharashtra NEET Counselling 2021: नीट यूजी प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मेरीट लिस्ट आज होणार जाहीर
पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्टेट कॉमन एट्रांस टेस्ट सेल आज आपल्या अधिकृत वेबसाइटवर Maharashtra NEET Counselling 2021 च्या पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार आहे.

Maharashtra NEET Counselling Round 1 Merit List:: पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्टेट कॉमन एट्रांस टेस्ट सेल आज आपला अधिकृत वेबसाइटवर Maharashtra NEET Counselling 2021 च्या पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार आहे. वेळापत्रकानुसार (NEET UG Counseling schedule) तात्पुरती गुणवत्ता यादी 19 जानेवारी 2022 रोजी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. अधिकृत वेबसाइट cetcell.net वर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गुणवत्ता यादी जाहीर केली जाऊ शकते.
एमबीबीएस ( MBBS), बीडीएस (BDS ) आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (Medical courses Admission) ही समुपदेशन प्रक्रिया (Maharashtra NEET Counselling 2021) केली जात आहे. उमेदवारांना कळवण्यात येते की संध्याकाळी 6 वाजता गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी फेज-I, फेज-II आणि फेज-III च्या नोंदणीकृत उमेदवारांची सामान्य यादी दुपारी 3 पर्यंत प्रसिद्ध केली जाईल.
पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना थेट https://cetcell.net/UG_NEET_2021/ या लिंकद्वारे गुणवत्ता यादीत त्यांचे नाव तपासू शकतात.
Maharashtra NEET Counselling Round 1 Merit List: मेरिट लिस्ट कशी तपासावी?
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट cetcell.net वर जा.
- होम पेजवर उपलब्ध round-1 प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवर क्लिक करा.
- तुमचे लॉगिन डिटेल्स भरा.
- यानंतर तुमच्या स्क्रीनवर मेरिट लिस्ट दिसेल.
- तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि सेव्ह देखील करू शकता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या