Top Recommended Stories

Maharashtra Political Crisis : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! बंडखोर मंत्र्यांच्या खात्यांचे फेरवाटप, जाणून घ्या आता कोणाकडे आहे कोणतं खातं!

Maharashtra Political Crisis : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी ठाकरे सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयामुळे बंडखोर मंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे.

Published: June 27, 2022 4:21 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

उद्धव ठाकरे यांचे शिंदे सरकारला आव्हान
उद्धव ठाकरे यांचे शिंदे सरकारला आव्हान

Maharashtra Political Crisis : राज्यामध्ये सध्या राजयकीय (Maharashtra Potitics) हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत अनेक घडामोडी वेगवान घडत आहेत. अशामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झालेल्या मंत्र्यांना मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्यासह पाच मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांची खाती काढून घेत फेरवाटप केली आहेत. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी ठाकरे सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयामुळे बंडखोर मंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे.

जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित असलेल्या पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. या फेरवाटपामध्ये बंडखोरांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंचं नगरविकास खातं काढून घेण्यात आले असून आधीपासूनच पर्यटन आणि पर्यावरण मंत्रालयाचा कारभार संभाळणाऱ्या आदित्य ठाकरेंना अधिक एक खाते देण्यात आले आहे.

You may like to read

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम सहा-अ मध्ये सहा-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तर मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या अधिकारांअंतर्गत हे निर्णय घेण्यात आलेत. मंत्री कोणत्याही कारणामुळे अनुपस्थित असल्यास मुख्यमंत्र्यांना त्यांची सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येतात. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निर्देश देण्याचे अधिकार असतात. याच तरतूदीनुसार ठाकरे सरकाने खात्यांचं फेरवाटप करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील संबंधित मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याकडील विभागांचे काम त्यांच्या नांवासमोर दर्शविण्यात आलेल्या मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे, असे देखील जाहीर करण्यात आले आहे.

मंत्र्याकडील खातेवाटपात बदल –

– एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले.
– गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे सोपवण्यात आले.
– दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे सोपवण्यात आले.
– उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आले.

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल –

– शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),

– राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

– अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)

– ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.