
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Maharashtra Political Crisis LIVE: राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा (Maharashtra Political Crisis) भूकंप घडला. 36 दिवसांत स्थापन झालेलं आणि अडीच वर्षे चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aaghadi Sarkar) अवघ्या 9 दिवसात कोसळलं. राज्यातील सत्तानाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रिपदाचा (CM Uddhav Thackeray Resign) राजीनामा दिला. अखेर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर या सर्व राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाला.
उद्धव ठाकरे यांनी स्वत: कार ड्राईव्ह करून राजभवनावर पोहोचून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यावेळी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते.दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं होते. सत्तेत असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आता मात्र शिवसेना नेमकी कुणाची, यावरून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
दुसरीकडे, भाजपने सत्ता स्थापन्याची तयारी सुरू केली आहे. मी पुन्हा येईल, असे सांगणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एक्शन मोडमध्ये आले आहेत. एकनाथ शिंदे गट आज मुंबईत दाखल झाला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे गुरुवारी राज्यपालांची भेट घेवून सत्ता स्थापनेचा दावा केला. आजच नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. राजभवनावर जय्यत तयारी सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. चला तर मग आजच्या घडामोडींवर टाकूया एक नजर…
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या