Maharashtra School Reopen: शाळांची घंटा वाजली! पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे - राजेश टोपे
Maharashtra School Reopen : ज्या ठिकाणी कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे

Maharashtra School Reopen : राज्यातील शाळांची घंटा (Maharashtra School Reopen) आजपासून पुन्हा वाजली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा (Corona Virus) धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने (district administration) घेतला आहे. पुणे वगळता मुंबईसह (Mumbai) राज्यातील अनेक भागांमध्ये शाळा (Mumbai School Reopen) सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्या असल्या तरी कोरोनाच्या (covid-19) भीतीने पालक मुलांना शाळेमध्ये पाठवण्यास तयार नाहीत. अशामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी ‘पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे.’ असे आवाहन केले आहे.
Also Read:
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘युरोपात कोरोनाची लाट (Corona Wave) सुरु असताना सुद्धा शाळा सुरु आहेत. राज्यातील रुग्णालयांमधील (Hospitals) 90 टक्के बेड रिकामे असून रुग्णालयात कोरोना रुग्णांचे (Corona Patient) दाखल होण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करुनच शासनाने (Maharashtra Government) शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाणार असून पालकांनीही मुलांना शाळेत पाठवावे आणि योग्य ती काळजी घ्यावी.’, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी शाळांबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, ‘शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्या पालकांना योग्य वाटतं त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावे. ज्या पालकांना रिस्क वाटते त्यांनी रिस्क घेऊ नये. शाळा सुरू होत असल्या तरी पुढची पावलं कशापद्धतीने टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवावे.’, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. दरम्यान, पुणे वळगळता राज्यातील इतर ठिकाणच्या शाळा सुरु झाल्या आहेत. काही ठिकाणी 26 जानेवारीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या