मुंबई: राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हळूहळू निर्बंध शिथिल केले जात आहे. याच साखळीतील पुढचा टप्पा म्हणून आता राज्यातील शाळा (Maharashtra School Reopening) सुरू करण्यात येणार आहेत. आता राज्यात पहिलीपासून शाळा सरसकट सुरू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Maharashtra Education Minister Varsha Gaikwad) यांनी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत शुक्रवारी सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात चर्चा केली. वर्षा गायकवाड लवकरच मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्सबरोबरही चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.Also Read - प्रेमासाठी काय पण! 20 वर्षीय तरुणीला 77 वर्षीय वृद्धासोबत करायचंय लग्न! कारण ऐकून बसेल धक्का

राज्यात कोरोनाची प्रादुर्भाव कमी झाला आहे. रुग्णसंख्येतही मोठी घट झाल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 8 ते 12 चे वर्ग सुरु झाले करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महाविद्यालये देखील सुरू करण्यात आले आहेत. आता पुढील टप्प्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. Also Read - Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये बंपर भरती! तुम्हीही करू शकता Application

राज्यात 8 ते 12 चे वर्ग सुरु होऊन 3 आठवडे उलटली आहेत. या तीन आठवड्यांचा अनुभव लक्षात घेता राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू कराव्यात, अशी भूमिका राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्र्यांसमोर मांडली. पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत अधिकृत प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल. त्याआधी टास्क फोर्सशी चर्चा करणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठकीत दिली. Also Read - MPSC Exam 2022: MPSC परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या परीक्षेच्या तारखा!

दरम्यान, महाराष्ट्रात 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये झाली आहेत. (Maharashtra College Reopening)  पूर्णपणे लसीकरण केलेले विद्यार्थी, अकृषी महाविद्यालये, राज्य संचालित विद्यापीठे, डीम्ड विद्यापीठे, स्वयं-वित्तप्राप्त विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी ऑफलाइन पद्धतीने वर्गात सहभागी होऊ शकतात, अशी अट घालून देण्यात आली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहनही सामंत यांनी केले आहे.

महाविद्यालयांनी कॅम्पस लसीकरण करावे

प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून महाविद्यालय सुरू ठेवायचे का नाही हा सर्वस्वी निर्णय स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्पस लसीकरण आयोजित करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तर वसतिगृह देखील टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही लसीकरण पूर्ण झालेले असावे, असं देखील उदय सामंत यांनी सांगितले आहे.