Top Recommended Stories

Maharashtra SSC-HSC Result 2022: केव्हा जाहीर होईल 10 वी-12 वीचा निकाल? घरी बसून असा बघू शकतात Result

Maharashtra SSC- HSC Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या 10 वी (SSC) आणि 12 वीच्या (HSC) परीक्षेच्या निकालाची (SSC- HSC Result 2022) आता प्रतिक्षा लागली आहे. अशात परीक्षार्थी विद्यार्थ्यांना लवकरच खूशखबर मिळणार आहे. महाराष्‍ट्र बोर्ड लवकरच आपल्या अधिकृत वेबसाइटवर 10 वी आणि 12 वीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

Updated: April 27, 2022 11:57 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Maharashtra SSC-HSC Result 2022
Maharashtra SSC-HSC Result 2022

Maharashtra SSC, HSC Results 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSHSEB) SSC अर्थात 10 वी आणि HSC अर्थात 12 वीच्या परीक्षांच्या निकालाची (SSC- HSC Result 2022) विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतिक्षा आहे. विद्यार्थ्यांना लवकरच निकालाबाबत खूशखबर मिळणार आहे. 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड याबाबत घोषणा करतील.

10 वी – 12 वीचे विद्यार्थी आपला निकाल (Maharashtra SSC and HSC results 2022) खाली दिलेल्या वेबसाइट्सवर बघू शकतात.

You may like to read

> mahahsscboard.in
> msbshse.co.in
> mh-ssc.ac.in
> mahresult.nic.in

निकाल पाहाण्यासाठी आईचे नाव आवश्यक…

गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल बघण्यासाठी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव द्यावे लागणार आहे. परीक्षा मंडळाने यंदा देखील अशीच व्यवस्था केली आहे. विद्यार्थी किंवा पालक निकाल पाहाण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकतात.

Maharashtra SSC, HSC result 2022 : निकाल पाहाण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स…

1. परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
2. रिझल्ट (Class 10 or Class 12 result) या लिंकवर क्लिक करावे.
3. आपला रोल नंबर आणि आईचे नाव सबमिट करावे.
4. तुम्हाला समोरिल स्‍क्रीनवर तुमचा रिझल्ट दिसेल.
5. रिझल्‍ट तपासून तुम्ही त्याचे प्रिंटआउट घेवू शकतात.

दरम्यान, महाराष्ट्रात 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल तर 12 वीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान घेण्यात आली.

परीक्षा मंडळाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांची लॉटरी, ‘त्या’ प्रश्नाचे गुण मिळणार

12 वीच्या परीक्षेदरम्यान चूक आढळून आली होती. ही चूक पहिल्याच दिवशी झालेल्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील आहे. त्यानुसार बोर्डाच्या अभ्यास समितीची बैठक पार पडत चुकीच्या एका प्रश्नाबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार चुकीचा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचा एक गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.