
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Maharashtra Swine Flu : देशातील कोरोना विषाणूचे (Corina virus) संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. असे असतानाच आता इतर अनेक विषाणू लोकांच्या समस्या वाढवत आहेत. मंकीपॉक्स आणि स्वाइन फ्लूनेही देशातील लोक चिंताग्रस्त झाले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra News)यावर्षी 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट दरम्यान स्वाइन फ्लूचे (Swine Flu) 2 हजार 337 रुग्ण आढळून आले आहेत. तर 98 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सोमवारी राज्याच्या आरोग्य विभागाने गणेशोत्सवात (Ganeshotsav) सहभागी होताना काळजी घेण्याचे आवाहन केले.
आरोग्य विभागाने सांगितले की, ही प्रकरणे 19 जिल्ह्यांमध्ये नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 770 प्रकरणे आणि 33 मृत्यू पुण्यात (Pune news) झाले आहेत. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत (Mumbai news) 348 प्रकरणे आणि तीन मृत्यूची नोंद झाली आहे, तर ठाण्यात 474 प्रकरणे आणि 14 मृत्यू आहेत. ते म्हणाले की, या कालावधीत कोल्हापुरात (Kolhapur news) 159 प्रकरणे आणि 13 मृत्यूची नोंद झाली आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर आता राज्यातील नागरिकांनी स्वाईन फ्लूला गांभीर्याने घ्यावे अशी आशा व्यक्त केली जात आहे.
‘या वर्षी 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे 2,337 रुग्ण आढळले असून 98 जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूचे वाढते रुग्ण पाहता नागरिकांनी सण सावधगिरी बाळगून साजरे करावे असे अवाहन करण्यात आले आहे. तसेच इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, तर उच्च जोखीम असलेल्या लोकांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोविड-19 उपयुक्त व्यवहाराचे पालन करावे. यासोबतच अशक्तपणा वाटणे, ताप येणे ही स्वाइन फ्लूची लक्षणे आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. तत्काळ डॉक्टरांची मदत घ्यावी असे आवाहन राज्यातील जनतेला आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. त्याचवेळी मृतांचा आकडा वाढल्याने चिंता आणखी वाढली आहे. राज्यात स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 पटीने वाढले आहे. 2020 मध्ये राज्यात 129 रुग्ण आढळले. तर तिघांचा मृत्यू झाला होता. 2021 मध्ये 387 प्रकरणे नोंदवली गेली आणि दोन लोकांचा मृत्यू झाला होता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या