मुंबई : महाराष्ट्र शिक्षण पात्रता चाचणी म्हणजेच Maharashtra TET 2021 साठी (TET Exam) प्रवेशपत्र 14 ऑक्टोबर म्हणजे आज अधिकृत वेबसाईटवर जारी केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे (Maharashtra State Examination Council Pune) द्वारे हे प्रवेशपत्र जारी केले जाणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी प्रवेशपत्राची जे वाट पाहत आहेत ते mahatet.in या वेबसाईटवर जाऊन आपला रोल नंबर आणि इतर तपशीलांच्या मदतीने लॉग इन (Log in) करुन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करुन शकतील.Also Read - Monsoon Update: बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा, आजपासून राज्यातील या भागात मुसळधार पाऊस!

31 ऑक्टोबर 2021 रोजी कोरोनाच्या प्रोटोकॉल लक्षात घेत (Corona Protocol ) ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र TET पेपर 1 आणि TET पेपर 2 साठी परीक्षा आयोजित केली जाते. TET पेपर 1 ची परीक्षा त्या उमेदवारांसाठी घेतली जाते जे पहिले ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना (1st to 5th standard Students) शिकवण्यासाठी इच्छुक असतात. तर TET पेपर 2 ची परीक्षा सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना (6st to 8th standard Students)शिकविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी घेण्यात येतो. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, ही बाब उमेदवारांनी लक्षात ठेवावी. Also Read - Breaking News Live Updates: पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, शरद पवारांचा केंद्राला इशारा

असे डाऊनलोड करा प्रवेशपत्र –

– अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या. Also Read - Shivsena Dussehra Melava 2021: आधी म्हणत होते मी पुन्हा येईन, आता म्हणतात मी गेलोच नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

– होमपेजवर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.

– लॉग इन पेजवर तुमचा अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्डसोबत लॉग इन करा.

– प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल त्याला डाऊनलोड करा.

– तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट आऊट काढून घ्यायला विसरु नका.

प्रवेशपत्रावर उमेदवाराचे नाव, जन्म तारीख, परीक्षा केंद्राची माहिती, रोल नंबर आणि अन्य माहितीचा समावेश असेल. उमेदवारांना सल्ला दिला जात आहे की, प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व माहिती एकचा तपासून पाहा. जर तुमच्या प्रवेशपत्रावर जर कोणतीही विसंगती असेल तर तुम्ही mahatet2021.msce@gmail.com वर जाऊन तक्रार करु शकता.

दरम्यान, कोरोनामुळे (Corona Virus) गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण क्षेत्राला (Education Sector) मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या (Covid-19) वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा-कॉलेज (School-College) बंद आहेत. त्यामुळे शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. अशामध्ये शैक्षणिक वेळापत्रक (Academic schedule) पूर्णपणे कोलमडले होते. अनेक परीक्षा रद्द (Exam canceled ) करण्यात आल्या तर आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे लक्षात घेता बऱ्याच परीक्षाचे वेळापत्रक जाहीर होत आहेत.