मुंबई : राज्यावर कोरोनाचे (Coronavirus) संकट आहे. गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण राज्य कोरोनाशी लढा देत आहे. अशामध्ये आता डेल्टा प्लस विषाणूने सरकारच्या चिंतेत वाढ केली आहे. राज्यामध्ये या विषाणूचे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या भीतीत आणखी वाढ झाली आहे. काही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सरकारने लॉकडाऊनचे (Lockdown) निर्बंध शिथिल केले होते. पण अशामध्ये नागरिकांचे मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडणे, बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी यामुळे पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. हे चित्र पाहता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध (Strict restrictions) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.Also Read - IND vs ENG : टीम इंडियाला धक्का, रोहित शर्मा कसोटीतून बाहेर, जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद

बुधवारी मंत्रीमंडळाची बैठक (Cabinet meeting ) पार पडली. या बैठकीत कोरोनाबाबतचा आढावा घेण्यात आला. अशामध्ये काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यानुसार निर्बंध शिथिल करण्याच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यासोबतच दुकानांच्या वेळा पुन्हा कमी करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. Also Read - COVID-19 Vaccine : मोठा निर्णय! आता कोणत्याही वयोगटातील नागरिकांना मिळणार लस, देशातील पहिल्या m-RNA लसला मंजुरी

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने (Maharashtra Government) निर्बंध शिथिल केले. याच दरम्यान राज्यात कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणू डेल्टा प्लसचे (Delta plus) 21 रुग्ण आढळले. केंद्र सरकारने (Central Government) आधीच या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशामध्ये राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. सध्याच्या निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करुन दुकानांच्या वेळा बदलण्यात येण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतची नियमावली जाहीर केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. Also Read - Rohit Sharma Daughter Video : रोहित शर्माच्या मुलीने बोबडे बोलत दिली वडिलांच्या तब्बेतीची अपडेट, व्हिडिओ झाला व्हायरल

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी डेल्टा प्लस (Delta Plus Variant In Maharashtra) विषाणूबद्दल माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले एकूण 21 रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक 9 रुग्ण रत्नागिरीत (Ratnagiri) तर जळगावमध्ये (Jalgaon) 7 रुग्ण आहेत. मुंबईमध्ये (Mumbai) 2 आणि पालघर (Palghar), सिंधुदुर्ग (Sindhudurg), ठाण्यामध्ये (Thane) प्रत्येकी एक रुग्ण आहेत.